Aryabhata प्रक्षेपित करण्यापूर्वी रशियाची कोणती अट भारताने केली होती पूर्ण.. ?
X
जून १९७१ ची गोष्ट आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली गेली. या बैठकीला भारताचे राजदूत डीपी धर, शास्त्रज्ञ विक्रम साराभाई, त्यांचे एक शिष्य यूआर राव आणि रशियाचे भारतातील राजदूत निकोलाई पेगोव्ह उपस्थित आहेत. या बैठकीत नक्की काय झालं.. या बैठकीचा उल्लेख आम्ही आता का करत आहोत.. तर हेच आपण पाहायचं आहे त्यामुळे हि माहिती संपूर्ण वाचा..
तर . पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती आणि साराभाई पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर देशाचा पहिला उपग्रह तयार करण्याची संपूर्ण योजना मांडत होते, परंतु मिशन पूर्ण करण्यासाठी प्रक्षेपण वाहनाची आवश्यकता असते. साराभाईंनी रशियन राजदूत पेगोव्ह यांच्याकडे मागणी करताच ते थोडे थांबले आणि त्यांनी काही प्रश्न करत भारतासमोर एक अट ठेवली.., तर त्यांचा पहिला प्रश्न होता, 'आधी सांगा चीनने प्रक्षेपित केलेला उपग्रह किती मोठा आहे?' हा प्रश्न ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मग यू आर राव म्हणतात – १९० किलो. निकोलाई पेगोव इंदिरा गांधी आणि साराभाईंकडे बघतात आणि म्हणतात की लाँच व्हेइकल देण्याची माझी एक अट आहे.
यु.आर.रावांनी विचारले - कोणती अट?
निकोलाई पेगोव म्हणाले - भारताचा पहिला उपग्रह चीनपेक्षा मोठा असावा...
भारताने ही अट मान्य करून उपग्रह बनवण्याची तयारी सुरू केली. 4 वर्षांनंतर, 19 एप्रिल रोजी भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला. आज याच भारताच्या पहिल्या उपग्रहाला प्रक्षेपित करून ४८ वर्ष झाले आहेत. तुम्हाला आठवत असेल आपली २ रुपयांची जी नोट आहे त्यावर देखील एकच आपल्या पहिल्या आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो आहे..