Home > News > हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता झाली ठाकरे घराण्याची सून; सुनेत्रा पवार यांनी दिल्या शुभेच्छा

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता झाली ठाकरे घराण्याची सून; सुनेत्रा पवार यांनी दिल्या शुभेच्छा

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता झाली ठाकरे घराण्याची सून; सुनेत्रा पवार यांनी दिल्या शुभेच्छा
X

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता या आता ठाकरे घराण्याची सून झाली आहे. निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी त्यांचा काल विवाह झाला.

या लग्नसोहळासाठी अनेक राजकीय नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्या पत्नीसोबत लग्नाला हजेरी लावली होती. सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करता म्हंटल आहे की, 'माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील जी यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. का. अंकिता आणि स्व. बाळासाहेबजी ठाकरे यांचे नातू, स्व. बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र चि. निहार यांच्या मुंबई येथील ताज पॅलेस येथे पार पडलेल्या लग्न समारंभास दादांसह उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशीर्वाद दिले.'

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली व्यवसायात जम बसविला आहे. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्ये आणि एक वर्ष हार्वर्डमध्येही शिक्षण घेतले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत. गेले काही दिवस या दोघांच्या विवाहाची चर्चा होती. काल या दोघांचाही विवाह सोहळा संपन्न झाला आहे.

Updated : 29 Dec 2021 11:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top