अनिता बोस यांचा आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यास नकार;
X
आजच्या काळात जरी बोस कुटुंबीय आणि काँग्रेसमध्ये दुरावा असला तरी आणि बीजेपी, आरएसएसला सुभाषचंद्र बोस यांचा कितीही कळवळा असला तरी बोस परिवाराने आरएसएस व त्यांच्या विचारांना आपल्यापासून चार हात लांबच ठेवले आहेत.
सुभाष चंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त शहीद मिनार येथे आरएसएसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यास नेताजींची कन्या अनिता बोस यांनी नकार दिला.
नकार देताना त्यांनी असं म्हंटलं की नेताजींचा विचार हा समाजातील सर्वांसाठी होता, त्यांचा आणि संघाच्या विचारांमध्ये कुठंच साम्य नाही .आणि संघाचे विचार कुठे जुळतही नाहीत असे सांगून अनिता बोस यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित लावण्यास नकार दिला.
जर त्यांना खरोखरच आदरांजली अर्पण करायची असेल तर, प्रथम त्यांना सुभाष बोस यांचे धर्मनिरपेक्ष विचार मान्य करावे लागतील असं मत अनिता बोस यांनी व्यक्त केलं.
कोण आहेत अनिता बोस?
अनिता बोस या सुभाषचंद्र बोस आणि पत्नी एमिली शेंकल यांच्या कन्या आहेत. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1942 रोजी झाला होता. अनिता बोस या ऑक्सबर्ग विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकाही होत्या .