आनंद महिंद्रांची 13 वर्षीय मुलीला थेट नोकरीची ऑफर! काय आहे कारण?
X
आनंद महिंद्रा, भारतातील उद्योजकांपैकी एक प्रसिद्ध उद्योजक असून ते नेहमीच चर्चेत आणि ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मिडियावर आनंद महिंद्रा Anand Mahindra वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त करतात. अनेक लोक त्यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करतात आणि आनंद महिंद्रा त्यातील काही मागण्या पूर्णही करतात. आणि ते अनेकांना नौकाऱ्याही देतात, नुकतेच त्यांनी एका 13 वर्षीय मुलीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे. तर कोण आहे ती मुलगी आणि आनंद महिंद्रा यांनी का दिली तिला नौकारीची ऑफर जाणून घेऊया !
अनेकजन आनंद महिंद्रा यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करतात, त्यांच्याकडे याआधी कोणी कार मागितली आहे, तर कोणी नोकरीसाठी विनंती केलीली आहे. दरम्यान सोशल मिडियाच्या माध्यमातून महिंद्रांनी थेट एका 13 वर्षीय मुलीला नौकारीची ऑफर दिली आहे. नोकरीची ऑफर दिलेली ही मुलगी उत्तर प्रदेशातील बस्ती शहराची रहिवासी आहे. तिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे आणि तिच्या लहान बहिणीचे प्राण वाचवले आहेत. 'अलेक्झा' नावाच्या व्हॉइस असिस्टंटची मदत घेऊन तिने हल्ला करणाऱ्या माकडांना हुसकावून लावले.
आनंद महिंद्र यांनी निकिता नावाच्या मुलीला नोकरीची ऑफर देताना एक्स X या समाजमाध्यमावर एक ट्वीट केलं आहे. आपल्या या ट्वीटमध्ये महिंद्र यांनी माकडांना हुसकावून लावणाऱ्या 13 वर्षीय निकिताचे तोंडभरून कौतूक केले आहे. आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होणार की या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणार हा आजच्या जगातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी कल्पकता अधिक सक्षम होऊ शकते, हेच निकिताच्या उदाहरणातून स्पष्ट होते. निकिताने केलेला हा विचार कौतुकास्पद आहे. यातून तिची नेतृत्वशैलीच समोर आली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर या मुलीला जर कॉर्पोरेट जगात नोकरी करायची इच्छा असेल तर आम्ही मदत करू. असं महिंद्रा यांनी म्हटलं आहे. "मी अपेक्षा करतो ही मुलगी शिक्षण झाल्यावर आमच्यासोबत काम करण्यास उत्सूक असेल", असे मत आनंद महिंद्र यांनी व्यक्त केले आहे.
या मुलीने अलेक्झाला दिलेल्या आदेशाचा आणि त्यानंतर माकडांनी पळ काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी या मुलीच्या शौर्याची दखल घेत तिचे कौतुक केले होते. आनंद महिंद्रांनी दिलेली ही नोकरीची ऑफर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली असून,अनेकांनी या मुलीच्या शौर्याचे आणि आनंद महिंद्रांच्या उदारतेचे कौतुक केले आहे.