संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा निर्णय झाला..
X
शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार आहे या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आता अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे. शरद पवार यांच्या अध्य़क्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय़ घेतला असल्याची माहिती दिली आहे. संजय राऊत यांना वक्तव्य केले असले तरी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल, त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय़ राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते आहे. पण आपण निधी वाटपामध्ये कोणताही भेदभाव केला नाही, बजेटमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व आमदारांना निधी देण्यात आला, त्यामुळे आपल्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे सरकार पडले तर काय यावर आपण आता काही बोलणार नाही, असेही त्यांनी नाना पटोले यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.