Home > News > कर्करोग रुग्णांसाठी ८ वर्षाच्या चिमुकलीने केले स्वतःचे केस दान

कर्करोग रुग्णांसाठी ८ वर्षाच्या चिमुकलीने केले स्वतःचे केस दान

अनेकजण आपले केस या रुग्णांसाठी दान करतात.पण अवघ्या ८ वर्षाच्या अहिल्याने स्वतःचे केस दान केले आहेत.

कर्करोग रुग्णांसाठी ८ वर्षाच्या चिमुकलीने केले स्वतःचे केस दान
X



Anchor :हकलेसे केस गळायला सुरुवात झाली तरी सामान्यतः माणूस वेगवेगळ्या उपायांचा शोध सुरू करतो.पण कर्करोगासारख्या आजारामध्ये डोक्यावरील संपूर्ण केस काढले जातात.अनेकजण आपले केस या रुग्णांसाठी दानही करतात.पण अवघ्या ८ वर्षाच्या अहिल्याने स्वतःचे केस दान केले आहेत.

सध्या अहिल्याविषयी समाजातून अभिमानाच्या प्रतिक्रिया येत आहेत .अहिल्या तांबे ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेते सत्यजित तांबे यांची मुलगी आहे.सध्या ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

इतक्या लहान वयात निःस्वार्थी कृती ,संवेदनशीलता आणि परिपक्वता दर्शवते.ही अभिमानाची गोष्ट आहे,असं ट्विट विनया देशपांडे यांनी केले आहे.

अहिल्याच्या फोटोसहित सत्यजित तांबे यांनी हे ट्विट केलं आहे.

उपचारादरम्यान केस गळणाऱ्या कर्करोग रुग्णांसाठी हे अत्यंत क्लेशकारक आणि मानसिक त्रासदायक आहे. माझी ८ वर्षांची मुलगी अहिल्या हिने निःस्वार्थपणे केसांचे दान केले आहे आणि या आजाराशी लढताना त्यांच्याशी एकता व्यक्त केली आहे. तिने मला समाजासाठी खूप काही करण्याची प्रेरणा दिली आहे . मला तिचा अभिमान आहे,असं सत्यजित तांबे यांनी ट्विट केलं आहे.

Updated : 28 July 2022 11:24 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top