सोनिया गांधी यांच्या नंतर प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण..
X
काँग्रेसच्या यूपीच्या प्रभारी सरचिटणीस प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, "आमच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी." प्रियंका गांधी या गुरुवारी लखनऊमध्ये आयोजित नव संकल्प शिबिर कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
प्रियंका गांधी यांनी ट्विट करून माहिती दिली
I've tested positive for COVID-19 with mild symptoms. Following all the protocols, I have quarantined myself at home.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 3, 2022
I would request those who came in contact with me to take all necessary precautions.
एका दिवसापूर्वी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी झाली. सोनिया गांधींच्या संपर्कात आलेल्या इतर काही नेत्यांमध्येही कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. सोनिया गांधी 75 वर्षांच्या आहेत. त्यानंतर त्यांची मुलगी सोनिया गांधी यांना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
लखनौमध्ये आयोजित काँग्रेसच्या दोन दिवसीय नवं संकल्प शिबीर कार्यक्रमातून प्रियंका गांधी पहिल्याच दिवशी दिल्लीला रवाना झाल्या होत्या. प्रियंका गांधी रस्त्याने दिल्लीत पोहोचल्या. प्रियंका गांधी या केवळ एक दिवसीय कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या. शुक्रवारीही ते दुसऱ्या दिवशी नव संकल्प कार्यक्रमात सहभागी होणार होत्या.