भावाचं कौतुक करतांना आदिती तटकरे झाल्या भावुक
X
राज्याच्या विधिमंडळाच्या अंतरीम अर्थसंकल्पीय काल अंतिम दिवस होता. यावेळी बंधू अनिकेत तटकरे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्त केलेल्या भाषणात बोलताना अदिती तटकरे यांना भावना अनावर झाल्या. आपल्या भावाचं तोंडभरून कौतुक करताना त्या गहिवरून गेल्या.
आदिती तटकरे बोलताना म्हणाल्या की, खरंतर आम्ही आमच्या पणजोबांपासून, आजोबांपासून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम पाहीलं. आजोबांनी रोहा तालूक्यात १७ वर्षे सभापती म्हणून काम पाहीलं. तसेच वडील, सुनिल तटकरे यांचा जवळपास ४० वर्षे राजकीय प्रवास या सगळ्यांचा राजकीय वारसा मला आणि अनिकेतला लाभला. आणि अनिकेत खऱ्या अर्थाने तो पुढे नेण्याचं काम केलं.
तटकरे बोलताना पुढे म्हणाल्या की, अनिकेतचं ग्राउंड पातळीवर माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम आहे, तो लोकांचे प्रश्न, समस्या समजून त्यावर काम करतो त्यामुळे साहजिकच त्याच्यावर मतदारसंघातील जनतेने भरभरून प्रेम दिलं.
शेवटी एक बहिण म्हणून मला त्याचा नेहमीच अभिमान राहील असं म्हणत बंधू अनिकेत तटकरे याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आदिती तटकरे यांनी आपलं भाषण संपवलं