Home > News > fast track court result: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 10 वर्षांचा सक्षम कारावास

fast track court result: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 10 वर्षांचा सक्षम कारावास

fast track court result: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 10  वर्षांचा सक्षम कारावास
X

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २७ वर्षीय आरोपीला विशेष जलदगती न्यायालयाने ( fast track court ) १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत २४ फेब्रुवारी २०१५ रोजी घडलेल्या या घटनेत न्यायालयाने बुधवारी निर्णय सुनावला आहे.

२४ फेब्रुवारी २०१५ रोजी दुपारी १२ वाजता तिलकचंद पवन रहांगडाले नावाच्या आरोपीने पीडित मुलीला घरी एकटी असल्याचे पाहून घराचे दार बंद करुन बळजबरी केली होती. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (२) (आय). सहकलम ३ (अ), ४ बाललैंगिक प्रतिबंधक कायदा सन २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात १६ साक्षीदार तपासण्यात आले होते. इतर कागदोपत्री पुरावा न्यायालयात सादर केल्याने अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभदा तोडणकर यांनी आरोपी तिलकचंद रहांगडाले याला १० वर्षांचा सश्रम कारावास व १६ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणातील पीडित मुलगी आजारी असल्याने न्यायालयासमोर साक्ष देण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोपी विरुद्ध दोष सिद्ध करणे अत्यंत कठीण झाले होते. परिस्थितीजन्य इतर पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची न्यायालयासमोर साक्ष तपासण्यात आली. पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

Updated : 14 Oct 2021 9:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top