सोशल मीडियावर शिवी देणं पडलं महागात..तरुणाला खावा लागला चोप
X
अक्षय ओहळ, पुणे ; महाराष्ट्रभर रिक्षा चालक यांचा ओबेर ओला आणि नियमबाह्य टॅक्सी बाईक यांच्या विरुद्ध लढा सुरू आहे. यावेळी रिक्षा चालकांच्या महिलांनी कठोर पाऊल उचलत नियमबाह्य टॅक्सी बाईक चालवणाऱ्या तरुणावर कारवाई केली याचा विडिओ सोशल मीडिया वरती खूप व्हायरल झाला. त्यावरती एका तरुणाने आक्षेपार्ह विधाने केली.
"रिक्षाचालकांच्या घरातील महिला बाईक टॅक्सी बंद करा म्हणून बाईक टॅक्सी चालकांना समज देत होत्या त्या व्हिडिओ याने रांडा आहेत या अश्या काही कॉमेंट केल्या होत्या"
ही चप्पल एका रिक्षावाल्याच्या आईची आहे. ही चप्पल एका रिक्षावाल्याच्या बहिणी, बायकोची, पोरीची , नातीची आहे. अपशब्द काढण्याच्या अगोदर आता विचार करायला हवा. माझा मुलगा 35 वर्षांचा आहे. तू पण एका बाईच्या पोटी जन्म घेतलायस. आणि आम्हाला शिव्या देतोस असे खडे बोल सुनावत रिक्षावाल्या महिलेने सोशल मिडीयावर्ती आई बहिनीवरून गलिच्छ शब्दात ट्रोल करणाऱ्या मुलाला धडा शिकवला.
त्या तरुणाला आता रिक्षा चालकांच्या महिलांनी चांगलंच खडसावलेलं आहे. आणि पुन्हा आशा आक्षेपार्ह कमेंट करणार नाही याची हमी घेतली आहे.