Home > News > डेटिंग अँपद्वारे मुलींचा नंबर घेऊन अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला अटक

डेटिंग अँपद्वारे मुलींचा नंबर घेऊन अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला अटक

डेटिंग अँपद्वारे मुलींचा नंबर घेऊन अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला अटक
X

डेटिंग अँपच्या माध्यमातून अज्ञात महिला आणि तरुणींचे संपर्क क्रमांक काढून त्यांना अश्लील मेसेज आणि व्हॉट्सअॅप कॉल पाठवणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पोलिस ठाण्यांमध्ये पाणी पोहोचवतो. 14 वर्षीय विद्यार्थिनिच्या आईच्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी भादवि कलम 454 (डी), 509, 506 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केला. पॉस्को कायद्याचे कलम १२ अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष गिंद्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की, "इतर मुलाच्या गर्लफ्रेंड आहेत, त्याला कोणीही पसंत करत नाही, त्याला गर्लफ्रेंड हवी होती.", म्हणून तो मेसेज करायचा. डेटिंग अॅपद्वारे महिला आणि मुलींचे नंबर काढून त्यांना अश्लील संदेश करायचा. हा आरोपी प्ले स्टोअर आणि विवाहविषयक वेबसाइटवर अपलोड केलेल्या महिला आणि मुलींच्या बायोडेटामधून नंबर आणि माहिती काढायचा.

तपासात असेही समोर आले आहे की आरोपी अश्लील मेसेज तसेच व्हॉईस मेसेज पाठवत असे आणि त्याने अनेक वेळा पीडितेला व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु तिने कॉल उचलला नाही आणि त्याला ब्लॉक केले.

पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल फोन आणि 4 सिमकार्ड जप्त केले असून त्यात महिला आणि मुलींचे नंबर सेव्ह आहेत. ज्यांची नावे Truecaller ऍप्लिकेशनवर सेव्ह केली होती.

विशेष म्हणजे विद्यार्थिनिच्या आईच्या तक्रारीनंतर डीसीपी अजय कुमार बन्सल झोन 12 यांच्या मार्गदर्शनाखाली मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे, पीएसआय धीरज वायकोस यांनी तत्काळ मोबाईल नंबर आणि लोकेशन तपासण्यास सुरुवात केली. तपासात आरोपी मालाड पूर्व पुष्पा पार्क येथील रहिवासी आहे. ही बाब समोर आली.

Updated : 21 Jan 2023 6:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top