Home > News > डेटिंगची नवीन पद्धत: तरुणींमध्ये 'सोलो डेटिंग'चा वाढता ट्रेंड!

डेटिंगची नवीन पद्धत: तरुणींमध्ये 'सोलो डेटिंग'चा वाढता ट्रेंड!

डेटिंगची नवीन पद्धत: तरुणींमध्ये सोलो डेटिंगचा वाढता ट्रेंड!
X

धावपळीच्या जीवनात स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी तरुणींमध्ये ‘सोलो डेटिंग’चा ट्रेंड चांगलाच वाढतोय. शहरातील काही तरुणींनी तर ‘सोलो डेटिंग’ करीत अख्खा देशच पालथा घातला आहे.

स्वतःसाठी वेळ काढून आनंद साजरा करण्याच्या या नव्या फंड्याने तरुणींना चांगलीच भूरळ घातलेली दिसते. काय आहे सोलो डेटिंग? सोलो डेटिंग म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यन्त नक्की बघा !

सोलो डेटिंग म्हणजे एकाकीपणे स्वतःसोबत वेळ घालवणे. यात तुम्ही चित्रपट बघणं, पुस्तक वाचणं, आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करणं, स्पा ट्रीटमेंट घेणं, एकटे फिरणं अशा अनेक गोष्टी करू शकता.

एकाकीपणे डेटवर जाणं हे थोडं आव्हानात्मक वाटू शकतं. पण ते यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून घेतल्याने ताणतणाव कमी होतो आणि तुम्ही फ्रेश व्हाल.

सोलो डेटिंग मध्ये स्वतःला जास्तीत जास्त समजून घेता येतं: सोलो डेटिंगमुळे तुम्ही जेवढा शांतपणे विचार कराल तेवढे स्वत:ला समजून घ्याल. सोलो डेटिंगमुळे आपण नवनवीन गोष्टी शिकण्याला प्राधान्य देतो. सोलो डेटिंगमुळे तुम्ही नवीन छंद शिकू शकता किंवा नवीन ठिकाणी प्रवास करू शकता. सोलो डेटिंगमुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता आणि इतर लोकांशी चांगले संबंध निर्माण करता यामुळे तुमचे आयुष्य समृद्ध बनू शकते. आशा प्रकारचे फायदा सोलो डेटिंगचे आहेत


महिन्यातून एकदा एकटे चित्रपट बघायला जाणे तसेच स्वतःला आवडती भेटवस्तू गिफ्ट करणे . आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आवडते जेवण करणे आणि नवीन छंद शिकण्यासाठी क्लास जॉइन करणे,

एकट्याने ट्रेकिंगला जाणून किंवा स्पा ट्रीटमेंट घेणे. सोलो डेटिंगमध्ये पुस्तक वाचण्यासाठी शांत जागी जाऊ शकता.

'सोलो डेटिंग' हा तरुणींसाठी स्वतःवर प्रेम करण्याचा आणि आनंदी राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तर मग तुम्हीही **'सोलो डेटिंग'**चा प्रयत्न का करत नाही?

Updated : 15 April 2024 6:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top