Home > News > यशस्वी पुरुषामागे आईची शिस्त आणि संस्कार

यशस्वी पुरुषामागे आईची शिस्त आणि संस्कार

यशस्वी पुरुषामागे आईची शिस्त आणि संस्कार
X

। आईचा आदर्श आणि उद्‌याचा राजाः जिजाऊंचा दृष्टिकोन ।

महाराष्ट्र हादरतोय,

शिवबांनी जिंकलेले गड, किल्ले अश्रू ढाळताय, बंधुबंधूच वैरी, आपल्या महाराष्ट्राचा विचार नाही. जय भवानी जय शिवाजी घोषणा देवुन, शिवराज्य साकारणार नाही. हा महाराष्ट्र पुन्हा एकदा त्या जिजाऊ मातेला शोधतोय! हा महाराष्ट्र पुन्हा एकदा जिजाऊने घडविलेला शिवबा शोषतोय, दुर्दशा पाहून महाराष्ट्राचा भगवा झेंडा आज तडफडतौय!

रोज ऐकू येणाऱ्या घटणांप्रमाणे आज आपला महाराष्ट्र भ्रष्टाचार, दरोडे, चोऱ्या, खुन, अत्याचार, बलात्कार, व्यसन, महागाई अशा दलदलीत फसला आहे. चोरी करून चोर दूर पळतोय आणि गरिबाला मात्र मार मिळतोय अशी परिस्थिती झाली आहे. या महाराष्ट्राला आज माता जिजाऊ आणि राजा शिवबांची आवश्यकता आहे. कारण, एका यशस्वी पुरुषामागे त्याच्या आईची शिस्त आणि संस्कारच असतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या राजमाता जिजाबाई आणि त्यांनी घडविलेले राजे शिवाजी महाराज. जिजामाता जानवर्धिनी होत्या. त्यांना या मायभुमीविषयी प्रेम आणि आस्था होती म्हणुनच तर पुण्यातील भुमी त्यांनी बालशिवबांच्या हस्ते सोन्याच्या नांगराने नांगरून पवित्र केली.

हल्ली तर एकही दिवस असा जात नाही की टि.व्ही वर, वर्तमानपत्रात बलात्काराची बातमी नाही. हेच नराधम इतकं वाईट कृत्य करून निर्दोष फिरतात, अगदी लहान लहान बालिकांनासुदधा है राक्षस सोडत नाही. यांचे दोषारोपण कुणावर ? त्यांच्या माउलीवरच ना! हो. कारण, त्या माऊलीतच जिजाऊरुपी हिंमत आणि सक्षमता नसल्याने ती आपल्या लेकरांना शिवबारूपी संस्काराचा डोस नाही पाजू शकली आणि त्यामुळे कित्येक जीवने उध्वस्त झाली.

आपल्या मायभुमीवर परकियांनी केलेला अन्याय त्यांना सहन झाला नाही. पण आज छोट्याश्या जमिनीच्या तुकड्‌यावरून भाऊच भावाचा खून करतो आणि त्या मायभूमीचा अपमान करतात, त्यांच्यात है राक्षसी क्रूर विचार का निर्माण झाले? कारण त्यांना घडविणाऱ्या त्या आईमधली जिजामाता कुठेतरी हरवलेली आहे. मातृभूमीविषयी प्रेम, आपुलकी आधी आईला असते, तेहाच ते संस्कार ती तिच्या मुलांमध्ये निर्माण करू शकते. आज आपल्याला पुण्याचे जे अवाढव्य स्वरुप दिसते, त्याचा पाया जिजाऊंनी सतराव्या शतकात घातला होता. माता जिजाऊंमध्ये स्वराज्याविषयी प्रेम रयतेविषयी आपुलकी आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी चीड होती. तेच संस्कार त्यांनी शिवबांवर केले.

तेच जिजामाता शिवाजीमहाराजांना नेहमी सांगत अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे कुणी वाईट दृष्टि जरी टाकली तनी त्यांना फाडून टाकायचे. जिजामातांनी शिवबांना पुस्तकी शिक्षणासोवत लष्करी जानसु‌द्धा दिले, म्हणूनच तर स्वराज्याची स्थापना झाली. आज आई मुलांना शाळेत तर पाठाविते पण, मुलगा नक्की वर्गातच बसतो कि अजुन कुठे वाईट संगतीत अडतून दारू, चोरी किंवा अजून काही गुन्हेगारीरूपी वाईट धंदयात तर अडकत नाही आहे ना, है बघायलाच विसरते. मुलगा शाळेच्या वेळेत जातो आणि शाळा सुटायच्या वेळी धरी येतो परंतु त्या दरम्यान तो काय करतो है बघणं त्या आईचच कर्तव्य असतं, पण अज्ञानपणामुळे कित्येक माता त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मग मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते. अशीच मुले मग महाराजांच्या पुतळ्यांसमोर दारू पिऊन नाचतात. दारुच्या नशेत स्वतः कधी चौकीत पोहोचतात त्यांना स्वतःला सुद्धा कळत नाही.

तेच त्यांच्या आईने वेळीच चौकस राहुन तिच्या बाळरूपी बीजाला खतपाणी घालून नीट संगोपण केल असतं तर आज त्यांच्यात शिवबारूपी गुणांच झाड उभं राहिलं असतं. एका यशस्वी पुरुषामागे, एका यशस्वी मुलामागे त्याच्या आईची शिस्त आणि संस्कारच असतात. आज आपण आपल्या मुलांना योग्य ज्ञान, योग्य संस्कार, शिस्त है सर्व दिले तर तो सुद्धा या राष्ट्राचा, या देशाचा चांगला नागरिक बनेल. एक चांगला माणूस एखा‌द्या राजापेक्षा कधीही कमी नसतो. सदगुण, सद्विचार, माणुसकी, प्रेम ही खुणगाठ प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या मनाशी बांधलीच पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणूनच आधी प्रत्येक आईमध्ये जिजाबाईंचे संस्कार रुजले पाहिजे.

आज आपल्या देशात राष्ट्रात मोठमोठे गुन्हेगार निर्माण झालेले आहेत. जेव्हा एखा‌द्या गुन्हेगाराला फाशी देण्यासाठी घेवून जातात आणि त्यांची शेवटची इच्छा विचारताल तेव्हा ते स्वतःच्या आईला भेटण्याची इच्छा सांगतात. मुलांसाठी स्वतःच्या आईपेक्षा जवळचे असे कुणीही नसते. कुठेतरी तर अगदी असं घडलं होतं कि एका गुन्हेगाराने

फाशीवर जायच्या आधी आपल्या आईला बोलावण्यास सांगितले आणि आई आल्यावर तिचा कानच चावून घेतला, बघा किती मोठे मर्म या गोष्टीत लपलेल. त्याच आईने, त्यानी पहिला गुन्हा केला तेव्हाच त्याचा कान पिळला असता, तर तो माणूस एवढा मोठा गुन्हेगार बनला नसता आणि परिस्थिती वेगळी असती. कदाचित तोच गुन्हेगार एक चांगला नागरिक बनला असता. म्हणूनच प्रत्येक आई मध्ये जिजाबाईचे संस्कार आणि धैर्य असेल तरच ती आपल्या मुलाला शिवाजी महाराजांसारखे घडवू शकते.

श्यामच्या आईने श्याम घडविला. एक छोटीशी गोष्ट अशी कि, शाम एकदा जेव्हा अंघोळ करुन आला आणि आईला म्हणाला आई माझ्या पायाला घाण लागेल तुझा पदर खाली पसरव, तेव्हा श्यामची आई म्हणाली शाम जशी पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तशी मनाला घाण लागू नये म्हणून जप आणि त्या गोष्टीतूनच श्याम घडला. आईचे संस्कार संपूर्ण विश्व बदलू शकतात.

जिजाबाईनी महाराजांना लहानपणापासूनच अध्यात्मिक जान दिले होते. म्हणूनच आई तुळजाभवानीची त्यांच्यावर कृपा होती. वेळेचे महत्व त्यांना शिकवले होते. तेव्हाच अवध्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी संपूर्ण स्वराज्य घडवले. आजकाल मुलांना अध्यात्म, देव याविषयी तितके ज्ञान नाही. सकाळी उठून देवाजवळ हात न जोडता मुलं टीव्ही, मोबाईल बघतात. त्यांना वेळेचे महत्व वाटत नाही, आजचे काम उद्‌द्यावर ढकलतात, त्यांना हेच कळत नाही कि, एकदा वेळ निघून गेली की जीवनात अपमान, निराशा याशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. जे वय काहीतरी करून दाखवायचे असते, आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे असते, त्या वयात मुले व्यसनात अडकतात आणि दारू सिगारेटच्या नशेत धुंद होतात आणि रोग आजार त्यांना आपल्या ताब्यात घेतात. अशाने अतिशय वाईट अवस्थेत मृत्यू त्यांना मिठी मारतो. या सर्व गोष्टीचे निरसन एक आई करू शकते. आई घडली तर मुले घडतात. प्रत्येक आई मध्ये राजमाता जिजाबाई, माता कौशल्या, माला यशोदा यांचे प्रेरणादायी विचार असले पाहिजे.

आपल्या देशातील प्रत्येक माता निर्भिड असली पाहिजे. जेव्हा शिवाजी महाराज कधी अडचणीत सापडले तर जिजामाता स्वतः महाराजांच्या मदतीसाठी धाव घ्यायच्या. प्रत्येक आईने आपल्या मुलांना कुणी वाईट रस्त्याला नेत असेल, आपली मुले संकटात असतील तेव्हा माता जिजाबाईसारखी वाघिणीची झेप घेतली पाहिजे. आपल्या मुलांचे गा-हाणे चारचौघांत वाटत बसण्या पेक्षा आपण आपल्या मुलांचा विश्वास कसा संपादनकरु शकतो, याचा विचार केला पाहिजे. आपल्या मुलांना आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. मुले वाईट नसतात त्यांना मिळालेली वागणूक वाईट असते. मुले म्हणजे मातीचा गोळा असतो ज्या आकारात घडविला त्याच आकारात घडतो. आता हे प्रत्येक आईने ठरविले पाहिजे कि आपल्या मुलाला शिवाजी महाराजांचा आकार द्यायचा की गुन्हेगाराचा. ज्या आई मध्ये माता जिजाबाईचे प्रेरणादायी विचार असतील त्या माता नक्कीच उ‌द्याच्या राजा घडवतील.

संस्काराच्या शिदोरीच गाठोडं आईजवळ असले कि ते वारसाहक्काने आपोआप मुलांकडे पोहोचते.

जय जिजाऊ | जय शिवराय ।

लेखिका मंगला रविंद्र शिरोळे

Updated : 19 Feb 2025 7:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top