त्याने आपल्या पत्नीला १० वर्ष घरात डांबुन ठेवलं पण का?
महिलांनी सुंदर असणं गुन्हा आहे काय़?
X
दिसायला सुंदर असलेल्या आपल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिला एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १० वर्षे घरात डांबुन ठेवण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये एका विकृत पतीने केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पिडीतेला बंधनातून मुक्त करून तिच्यावर आता शासकीय रूग्णालयात उपचार केले जात आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
"तू दिसायला सुंदर आहेस, त्यामुळे तुझ्यावर कुणाचीही वाईट नजर पडू नये यासाठी तुला घरातच राहावं लागेल असं एका विकृत पतीने आपल्या पत्नील काल परवा नाही तर तब्बल १० वर्षांपुर्वी सांगितलं होतं आणि आजतागायत ती घरातून बाहेरच पडली नव्हती. पिडीतेची मोठी बहिण जिल्हा माहिती अधिकारी आहे. त्यांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांना संपर्क करून घडल्या प्रकाराबद्दल सांगितले. संगिता धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेचे घर गाठले आणि तिची त्या काळकोठडी समान घरातून सुटका केली.
या घटनेचा महिलेवर गंभीर परिणाम पहायला मिळाला. दहा वर्षांपासून स्वतःच्याच घरात कैद असलेल्या पिडीतेच्या पायाला जखमा झाल्याने तिला धड चालताही येत नव्हते. घराबाहेर पडल्यावर थेट दहा वर्षांनंतरचं जग पाहताना तिला अचंबीत व्हायला झालं होतं. सध्या या पिडीत महिलेवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
महिलांनी सुंदर दिसणं गुन्हा आहे का?
आज बीड मधील या विचित्र प्रकारामुळे आपणा सगळ्यांनी हादरे बसले असतीलच पण असे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून खासकरून महिलांसोबूत घडतट असतात. अनेकदा एखादी मुलगी आवडली तर तिची भर रस्त्यात छेड काढली जाते. एकतर्फी प्रेमात तिने नकार दिल्यावर तर तिच्यावर ऍसिड हल्ला केला जातो. रात्री उशीरा पर्यंत एखादी महिला अथवा तरूणी सामसुम रस्त्यावरून जात असताना तिच्यावर एक तर अतिप्रसंग केला जातो. खरंच महिलांनी सुदंर दिसणं हा त्यांचा गुन्हा आहे का?