महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ; महिलांचे कुठे किती मतदान?
X
महायुती सरकारने आणलेल्या आणि राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या 'लाडकी बहीण' योजनेचा परिणामस्वरूप यंदाच्या निवडणुकीत महिलांचा मतटक्का वाढण्यातही दिसून येत आहे. राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. तसेच, मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात महिलांचे मतदान झाले आहे. तर महिलांचे मतदान अधिक झाल्याने महायुतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नंदुरबार, धुळे, सोलापूर, वाशिम या ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. आणि महिलांच्या मतदान टक्केवारीत मोठी वाढ देखील झाली आहे. लाडकी बहीण योजना निकालावर परिणाम करण्याची शक्यता आहे. तर महिला मतदारांचं मतदान कोणाच्या बाजूने झुकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
महिलांचं कुठे किती मतदान?
बुलढाणा जिल्ह्यात यंदा ७ लाख १३ हजार १९१ महिलांनी मतदान केले आहे. तर नाशिक जिल्ह्यात यंदा महिलांच्या मतदानामध्ये ९.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भुसावळमध्ये ८७ हजार ८२५ महिलांनी मतदान केले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर महिलांच्या रांगा पाहायला मिळाल्या. कोल्हापुरातही मतदान करण्यासाठी महिलांमध्ये उत्साह आणि अनेक केंद्रावर महिलांच्या रांगा पाहायला मिळाल्या. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख ४१ हजार ९३४ महिलांनी मतदान केले आहे. तर अकूनच महिलांच्या मतदानात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.