घरच्यांचा विरोध असूनही या मुलीने केली सुवर्ण कामगिरी...
आता अॅलंपीक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न ती पाहतीये..
X
उस्मानाबाद तालुक्यात तेर या ग्रामिण भागातील राधा गोरोबा गोरे ह्या मुलीने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. राधा हीला घरातुन खेळाला विरोध वीरोध अलताना देखील ही सुवर्ण कामगीरी केली आहे. घरच्यांना मुलीने शिकुन डॉक्टर व्हावे असी इच्छा होती. मात्र राधाला भाला फेक खेळाची खुप आवड होती. ही खेळातील आवड पाहुन तीच्या आत्याने तीला लातुरला शिक्षणासाठी सोबत घेतले व तेथे तिला खेळासाठी प्रशिक्षकही दिला . १० ऑगस्ट रोजी पणजी गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राधाने ३८ .५ मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक मिळवले आहे .
नुकत्याच टोकीयो येथे झालेल्या आलोंपीक स्पर्धेत भारताने भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे याच खेळ प्रकारात राधा हीने ही सुवर्ण कामगीरी केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामळे तिच्या घरातील विरोधही आता मावळला आहे . भविष्यात आनखी कठीन प्रयत्न करून आलोंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न राधाने ठेवले असुन या साठी तीज्या आई -वडीलांनीही शुभेच्छा दिल्या आहेत .