Home > News > 'एक नारी सब पे भारी', एकट्या तरूणीने सहा जणांना दिला चोप

'एक नारी सब पे भारी', एकट्या तरूणीने सहा जणांना दिला चोप

एक नारी सब पे भारी, एकट्या तरूणीने सहा जणांना दिला चोप
X

जगभरात लाखो महिला दररोज लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. गुन्हेगारांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी महिलांना अनेकदा स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचा सल्ला दिला जातो. पण आजकालच्या मुली आत्मनिर्भर झाल्या आहेत आणि त्यांना स्वतःचा बचाव करत अडचणीतून बाहेर कसं पडायचं हे चांगलंच माहित आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये काही मुले एका मुलीला चारही बाजूंनी घेराव घालतात आणि तिचा छळ करू लागतात, मात्र यावेळी ती मुलगी सर्वांना चोख उत्तर देते.

समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक धाडसी मुलगी तिला त्रास देणार्यार आणि धमकावणार्यां सहा मुलांपासून स्वतःचे रक्षण करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सहा लोक सामसुम रस्त्यावर एका मुलीला त्रास देताना दिसत आहेत. व्हिडीओचे ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही. मुलगी मग त्या मुलांशी भांडते आणि मार्शल आर्ट्सच्या मूव्ह्स आणि फ्लाइंग किकसह त्यांना जमिनीवर पाडते. तिने सर्व सहा मुलांना एक एक करून पायाने लाथ मारून खाली पाडले. २५ सेकंदांचा हा व्हिडीओ 'द फिगेन' अकाउंटने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मुलींना त्रास देऊ नका!' या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ३५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि ९ हजारहून अधिक वेळा हा व्हिडीओ शेअर केला गेला आहेत.

हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा अंदाज या व्हिडिओवरून लावता येतो. नेटिझन्स तिच्या शौर्य आणि सामर्थ्याने मोहित झाले होते, तर अनेकांनी असंतोष व्यक्त केला की महिलांना दररोज इतका त्रास सहन करावा लागतो. एका यूजरने लिहिले की, 'कोणत्याही मुलीला असा संघर्ष करावा लागू नये. तुमच्या मुलांना शिकवा की हे कधीही ठीक नाही. दुसऱ्याने लिहिले, 'निंजाचे खरे उदाहरण.'

Updated : 15 Jun 2022 1:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top