तपास यंत्रणांना घाबरून एक प्रसिद्ध अभिनेता शिंदे गटात?
X
बॉलिवुडमधील अभिनेता आणि कोरोना काळात गोरगरीब आणि मजुरांना केलेल्या मदतीमुळे सामाजिक कार्यात देखील प्रकाशझोतात आलेला परंतू केंद्रीय तपास संस्थांच्या रडावर असलेलेला अभिनेता सोनू सुदनं आज खा. श्रीकांत शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
राज्यात सत्तापरीवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. अभिनेता सोनू सूद त्यावेळी शिर्डीत आला होता. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने राज्यातील नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. 'नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात असे धोरण आणावे की, ज्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे सुकर होईल,' अशी अपेक्षा सूद याने व्यक्त होती. आज दिल्लीमधे झालेल्या बैठकीत खा. राहुल शेवाळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना भेटून सविस्तर चर्चा केल्याचे समजते.
सोनू सूद याने करोना काळात गोरगरीब आणि मजुरांना केलेल्या मदतीमुळे तो सामाजिक कार्यात देखील प्रकाशझोतात आला आहे. अनेक चित्रपटात सोनू खलनायकाची भूमिका बजावत असला तरी खऱ्या आयुष्यात अनेकांना मदतीचा हात देऊन तो त्यांच्यासाठी नायक ठरला आहे. सोनू सूद हा साई भक्त असून तो अनेकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो.
सोनू सूदचा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये मोठे सामाजिक काम सुरू करण्याचा त्याचा मानस आहे. शिर्डी येथे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम तसेच शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिर्डीतील त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुढील काही महिन्यातच या आश्रमाचे काम सुरू करण्यासाठी सोनू सूद शिर्डी जवळ जमीन खरेदी करत आहे.
त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आणि शासकीय परवानग्या मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोनू सूद याच्या शिर्डी वाऱ्या वाढल्या असून या आश्रमाच्या माध्यमातून शिर्डी परिसरात देश पातळीवरील सामाजिक काम उभे करण्यासाठी त्याच्या हालचाली सुरू आहेत.
सोनू सूद केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर आहे. कोरोना काळात परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून 2.1 कोटी रुपये गोळा केले असून परदेशी नियमन कायद्याचे उल्लंघन केल्या आरोप आहे. सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरु असताना, कर चुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत, असं आयकर विभागाचा आरोप आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोनू सूदनं आपला चॅरिटी ट्रस्ट 2 जुलै 2020 रोजी बनवला होता. या ट्रस्टमध्ये 18 कोटी 94 लाख रुपये आले. यापैकी एक कोटी 90 लाख रुपये विविध धार्मिक कामांसाठी खर्च करण्यात आले आहेत. तर 17 कोटी रुपये अजूनही ट्रस्टच्या खात्यामध्ये आहेत.
आयकर विभागाच्या मते या खात्याची चौकशी करताना असं आढळून आलं आहे की, सोनू सूदच्या चॅरिटी ट्रस्टला परदेशातून देखील दोन कोटी एक लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुढील तपासात असे उघड झाले आहे की, हा गट बोगस बिलिंगमध्ये सहभागी आहे. आतापर्यंत सापडलेल्या अशा बोगस करारांचे पुरावे, 65 कोटी बेहिशेबी रोख खर्चाचे पुरावे, भंगारची बेहिशेबी विक्री आणि बेहिशेबी रोख व्यवहाराचा पुरावा देणारा डिजिटल डेटा देखील सापडला आहे. आयकर विभागाच्या तपासात असं सांगण्यात आलं आहे की, या इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप/कंपनीने संशयास्पद परिपत्रक व्यवहारात जयपूर स्थित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत 175 कोटींचा घोटाळाही केला आहे.
सोनू सुदने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्याचा शिर्डीमधील प्रकल्प मार्गी लागेल त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा देखील बंद होईल असा अंदाज
आता व्यक्त केला जात आहे.