Home > News > तिच्या गालावर खळी; तिने प्रीती झिंटाची आठवण करून दिली !

तिच्या गालावर खळी; तिने प्रीती झिंटाची आठवण करून दिली !

तिच्या गालावर खळी; तिने प्रीती झिंटाची आठवण करून दिली !
X

इंडियन प्रीमियर लीग मध्ये केवळ क्रिकेटरचं नाही तर स्टँडमध्ये असलेल्या सुंदर मुलींचाही उत्साह असतो. याच उत्साहात राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात एक गोंडस आणि सुंदर 'मिस्ट्री गर्ल' दिसली, जिचे डिंपल्स प्रिती झिंटाची आठवण करून देतात. कोण आहे ही राजस्थान रॉयल्सची मिस्ट्री गर्ल खरचं तीच्या गालावरची खळी प्रीती झिंटाच्या डिंपल्सला मॅच करते करते .

इंडियन प्रीमियर लीगची स्वतःची क्रेझ आहे. केवळ मैदानावर खेळणाऱ्या खेळाडनांच नाही तर स्ट्रँडमध्ये उपस्थित असलेल्या सुंदर मुलींना देखील पाहण्यासाठी लोक आपल्या घरचा टीव्ही चालू ठेवतात आणि कॅमेरामन देखील या सुंदर मुलींना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतात आणि मोठ्या स्क्रीनवर दाखवतात. 19 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. राजस्थानने 6 विकेट्स राखून या सामन्यात विजय मिळवला आणि या विजयाचा आनंद घेण्यासाठी स्टँडमध्ये दिसलेली 'मिस्ट्री गर्ल' लगेचच व्हायरल झाली. राजस्थान रॉयल्सने तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे वेगवेगळे लूक आणि गोंडस डिंपल्स पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

या 'मिस्ट्री गर्ल'चे नाव आंचल अग्रवाल आहे आणि ती स्वतः एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि इंस्टाग्रामवर तिचे 5.4 लाख फॉलोअर्स आहेत. आंचलने न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि त्यानंतर तिने तिचे यूट्यूब चॅनल सुरू केले, ज्यावर ती स्टँड-अप कॉमेडीचे व्हिडिओ शेअर करते. आता IPL मधील तिच्या दिसण्यामुळे ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

आंचल फक्त सुंदर मुलगी नाही तर यशस्वी स्टँड-अप कॉमेडियनसुद्धा असून. तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने न्यूयॉर्कमधील नामवजा विद्यापीठातून शिक्षण घेतले हेही तिच्या व्यक्तिमत्त्वात भर टाकते. राजस्थान रॉयल्सने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. मनोरंजन क्षेत्रात ती एक नाव म्हणून नक्कीच लक्षात राहील!

Updated : 8 April 2024 9:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top