पाच मुलींचा बाप असलेल्या 90 वर्षांच्या वयोवृद्धाने 75 वर्षांच्या महिलेशी केलं लग्न; कारण...
X
असं म्हणतात की जोडीदाराशिवाय आयुष्य अपूर्ण आहे आणि एकटेपणाची भावना व्यक्तीचे आयुष्य खूप कठीण बनवते, मग वय कितीही असो. त्यामुळे आनंदी जीवनासाठी जोडीदाराची गरज असते. आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आपले आयुष्य जगत असलेल्या 90 वर्षीय पुरुषाने 75 वर्षांच्या महिलेशी लग्न केल्याची घटना आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध वर शफी अहमद यांचा लग्न चर्चेचा विषय ठरत आहे.
उत्तर प्रदेशाच्या रामपूर जिल्ह्यातील भोट परिसरातील नरखेडी गावात राहणारे 90 वर्षांचे वृद्ध शफी अहमद हे पाच मुलींचे वडील आहेत. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर गावातच किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत जीवन जगतायत. वडिलांचा एकटेपणा पाच विवाहित मुलींना पहिला जात नसल्याने सर्वांनी मिळून ठरवले की, पुन्हा एकदा वडिलांच लग्न लावून त्यांच्या एकटेपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर 90 वर्षीय शफी अहमद 75 वर्षांच्या महिलेशी सर्वांच्या संमतीने लग्न लावण्यात आले.
त्यांनतर आपल्या लग्नावर बोलताना शफी अहमद म्हणाले की, मला पाच मुली असून त्यांचं लग्न झाल्याने त्या आपपल्या सासरी राहतात. त्यामुळे एकट जगताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे लग्नाला होकार दिला. तर 75 वर्षीय नवरी असलेल्या आयशा लग्न का केलं यावर बोलताना म्हणाल्या की, या वयात मला साथ देणारं कुणीच नव्हतं, खाण्यापिण्याची सुद्धा अडचण होती. त्यामुळे किमान राहिलेलं जीवन चांगलं आणि जोडीदाराच्या सोबत जगता येत असेल तर हरकत काय ?म्हणून लग्नाला होकार दिल्याच्या आयशा म्हणाल्या.