८९ टक्के रुग्णांना Omicronची बाधा
X
Omicron व्हेरिएन्टच्या प्रचंड संसर्ग क्षमतेमुळे तिसरी लाट जास्त मोठी असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मुंबईच कोरोचे रुग्ण कमी होत आहेत. पण मुंबईत तिसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळले त्यापैकी ८९ टक्के रुग्णांना Omicronची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिसरी लाट ही Omicronची आहे, हे आता उघड झाले आहे. मुंबईतील 280 नमुन्यांपैकी 89 टक्के म्हणजे 248 नमुने हे चाचणी दरम्यान Omicron बाधीत होते असे आता जिनोम सिक्वेन्सिंग मधून समोर आले आहे. तर २८० पैकी 8 टक्के म्हणजे 21 नमुने हे Delta व्हेरिएन्टचे होते. तर उरलेल्या 3 टक्क्यांमध्ये म्हणजे 11 जणांच्या नमुन्यांमध्ये इतर प्रकार दिसले आहेत.
कोविडच्या लसीकरणाच्या आधारे देखील यामध्ये विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामध्ये 280 जणांपैकी 7 पेशंटचे कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता. यापैकी 6 जणांना हॉस्पिटलमध्ये एडमिट करावे लागले होते. तर केवळ दोन पेशंटना ICUमध्ये दाखल करावे लागले. लसीचे दोन डोस घेतलेल्या 174 पेशंटपैकी 89 जणांना हॉस्पिटलमध्ये करावे लागल्याची माहिती यामध्ये समोर आली आहे. तर या एकूण रुग्णांपैकी केवळ 2 रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली आणि 15 जणांना ICUमध्ये दाखल करावे लागले.
करोना विषाणूच्या Omicron व्हेरिएंटचा किती प्रसार झाला याची माहिती मिळवण्यासाठी चाचणी घेण्यात आली. या आठव्या चाचणीचे निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत. या आठव्या फेरीमध्ये एकूण ३७३ नमुने तपासण्यात आले. यापैकी २८० नमुने मुंबई महापालिका क्षेत्रातील होते, तर उरलेले नमुने इतर क्षेत्रातील होते.