Home > News > राज्यात काल 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त..

राज्यात काल 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त..

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के...

राज्यात काल 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त..
X

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. राज्यात आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. सरकार अनेक निर्बंधात शकतीलता आणत आहे. काल मंगळवार राज्यात नवीन 4 हजार 408 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 5 हजार 424 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 116 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.

आजपर्यंत एकूण 62 लाख 01 हजार 168 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के एवढे आहे. राज्यात दुसरी लाट आता कमी होताना दिसत असली तरी अजूनही नवीन कोरणा बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. पण दिलासादायक बातमी अशी की दररोज कोरोनातुन मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

डेल्टा प्लसचे दिवसभरात 10 नवीन रुग्ण

राज्यात काल दिवसभरात डेल्टा प्लसचे नवीन दहा रूग्ण आढळून आले आहे. यामुळे राज्यभरातील एकूण रूग्ण संख्या ७६ झाली आहे. राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होऊ लागला असला तरी आता या नवीन डेल्टा पल्सने नव्याने डोके वर काढले आहे.

Updated : 18 Aug 2021 7:18 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top