Home > News > सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची संधी..

सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची संधी..

सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची संधी..
X

ऑइल इंडिया लिमिटेड ने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिकृत वेबसाईट oil-india.com वर जाऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

भरती निघालेल्या जागा नक्की आहेत तरी काय?

तर या भरती प्राक्रियेद्वारे ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये 187 पदांची भरती केली जाईल. यामध्ये श्रेणी 3 ची 134 पदे, श्रेणी 5 ची 43 पदे आणि श्रेणी 7 च्या 10 पदांचा समावेश आहे.

अर्ज करणार असाल तर या तारखा आहेत महत्वाच्या..

अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया - यासंदर्भात तुम्हाला website वर माहिती मिळेल.

उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित (MCQ) परीक्षेचा असणार आहे. यामध्ये पात्रता असलेले गुण SC/ST/बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्तींसाठी किमान 40% असतील (जेथे आरक्षण लागू असेल) आणि इतरांसाठी किमान 50% गुण. संगणकावर आधारित चाचणीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्तेच्या आधारावर CBT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्यासाठी किती फी आहे?

सामान्य / ओबीसी : रु 200

SC/ST/EWS/बेंचमार्क अपंग व्यक्ती/माजी सैनिक: शुल्कात सूट आहे...

Updated : 31 March 2023 10:12 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top