Home > News > बुलडाणा जिल्ह्यात तब्बल 3 महिन्यांमध्ये 10 बालविवाह रोखले

बुलडाणा जिल्ह्यात तब्बल 3 महिन्यांमध्ये 10 बालविवाह रोखले

तीन महिन्यांच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात 10 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय 18 व मुलाच्या लग्नाचे वय हे 21 वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बालवयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे.

बुलडाणा  जिल्ह्यात तब्बल 3 महिन्यांमध्ये 10 बालविवाह रोखले
X

बुलडाणा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईनच्या समन्वयाने जिल्ह्यात जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात 10 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय 18 व मुलाच्या लग्नाचे वय हे 21 वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बालवयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. यामुळे मुलींचे शिक्षणदेखील पूर्ण होत नाही. यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते आणि पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो.

लहान वयात लग्न केल्यामुळे शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडावे लागत आहे.हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु समाजातील जागरुक नागरिक व ग्रामस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या बालविवाहाची माहिती जिल्हा कल्याण समिती चाईल्ड लाईन च्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा बाल कल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईनच्या समन्वयाने बुलडाणा जिल्ह्यात 10 बालविवाह रोखण्यात आले. बाल विवाह जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत रोखण्यात आले आहे.बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल कल्याण समिती च्या अध्यक्षा उज्ज्वला कस्तुरे,समिती सदस्या ॲड.किरण राठोड, आशा सौभाग्ये,ॲड.सदाशिव मुंडे, बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे,चाईल्ड लाईनचे समन्वयक शेख शोएब व ग्रावसेवक, ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य,अंगणवाडी सेविकांच्या मदतीने संबंधित बालिका व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालविवाह रोखण्यात यश आले आहे. तर 1098 येथे संपर्क साधावा.सध्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या वयाचा विचार करता बालविवाह होत आहेत. मुलींच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना बालविवाहास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. गावात अथवा इतर कोणत्याही ठिकाणी बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अथवा चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. बालविवाह रोखण्यासाठी समाजातील कोणताही नागरिक तसेच स्वत: बालक किंवा बालिका व स्वयंसेवी संस्थेने बालविवाह होत असल्यास किंवा बालकांसोबत गैरकृत्य होत असल्यास चाईल्ड लाईनकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Updated : 3 April 2022 8:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top