Home > रिपोर्ट > 'टकाटक' दिशाहीन झालेल्या तरुणांची गोष्ट

'टकाटक' दिशाहीन झालेल्या तरुणांची गोष्ट

टकाटक दिशाहीन झालेल्या तरुणांची गोष्ट
X

एकीकडे इंटरनेटच्या माध्यमातून अख्ख जग जणू हातात आलय. तर दुसरीकडे इंटरनेटमुळे होणा-या असंख्य दुष्परिणामांचा सामना या पिढीला करावा लागत आहे. यामुळे दिवसेंदिवस नाती दुभंगली जातायेत. या सगळ्या आव्हानांना रचनात्मक पद्धतीने वाचा फोडण्याचे काम दिग्दर्शक मिलिंद कवटे यांनी ‘टकाटक’ चित्रपटातून केले आहे. शहर आणि ग्रामीण अश्या दुहेरी कथानकातून दिग्दर्शकाने सद्याच्या तरुणाईचं वास्तविक रुप रचनात्मक पद्धतीने पुढे आणले आहे. चित्रपटात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अश्लील दृष्य आणि भरघोस शिव्यांचा चावट पॅकेज आहे. कारण हा चित्रपट केवळ प्रौढांसाठी आहे. अश्लील दृष्य आणि तुफान शिव्या ही दिग्दर्शकाची जमेची बाजू म्हणता येईल. किंबहुना त्यामुळेच त्यांना तरुणाई आणि त्यांच्या आव्हानांना पुढे आणता आले.

ही कहाणी आहे एका लिंग पिसाट अर्थात सेक्स अॅडिक्ट तरुणाची आणि तारुण्यात दिशाहीन होऊन गर्भवती झालेल्या तरुणीची. मुंबईच्या चोमणेश्वर (अभिजीत आमकर) या तरुणाला पाॅर्न पाहण्याचा प्रचंड नाद असतो त्यामुळे तो ‘सेक्स अडिक्ट’ होतो. तर दुसरीकडे पुण्याच्या ग्रामीण भागात राहत असलेल्या मिनी ( रितीकि शोत्री ) तारुण्यात चुकीच्या दिशेने जाऊन गर्भवती होते. एकीकडे अपार प्रेम करणा-या ठोक्याच ( प्रथमेश परब ) प्रेम मिनीला कळत नाही आणि ती गावातल्या एका धोकेबाज मुलाशी प्रेम करुन शरीरसुखाच्या दलदलीत जाऊन फसते. मुंबईच्या चोमणेश्वर या सेक्स अॅडिक्ट मुलाशी मिनीच्या बहिणीचं कामाक्षी (प्रणाली भालेराव) लग्न जुळत. चोमणेश्वर वारंवार कामाक्षीला सेक्स पोझिशन घेऊन एकरुप व्हायला सांगतो. मात्र, कामाक्षी यामुळे मानसिक तनावात जाते. हळूहळू चोमणेश्वर आणि कामाक्षीच्या नात्यातील गोडवा कमी होत जातो आणि ताती दुभंगली जातात. दुसरीकडे मिनी खोट्या प्रेमाच्या तावडीत येऊन गर्भवती होते. त्यामुळे ती नैराश्यात जाते मात्र, तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा मित्र ठोक्या मिनीला ऐनवेळी साथ देऊन ओढावलेल्या संकटातून बाहेर काढतो. “आपला हात जग्गनाथ” आणि “ये चंद्राला” गीत अतिशय प्रभावीपणे दृष्ट्याकिंत केले आहे. वरुन लिखाते यांनी चित्रपट संगीतबद्ध केले आहे, तर संवाद संजय नवगीरे, जय अत्रे यांनी गीत लिहिले आहे, तर गीत स्वरबद्ध आनंद शिदे आणि श्रृती राणे यांनी केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक मिलिंद कवटेंनी दिशाहीन झालेल्या तरुणांच्या समस्येवर प्रकाश टाकले आहे असे म्हणायला हरकत नाही.

– रवी चव्हाण

Updated : 8 July 2019 5:52 PM IST
Next Story
Share it
Top