एकीकडे भाजपाचा जंतरमंतरवर धरणं आंदोलन तर दुसरीकडे ममता यांची बंगालमध्ये रॅली
Max Woman | 15 May 2019 11:54 AM IST
X
X
अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन निवडणुकीला हिंसाचाराचे वळण लागले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्याचा ममता बॅनर्जींंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.
रोड शो दरम्यान अमित शहा यांनी हिंमत असेल तर ममता यांनी अटक करून दाखवावी असं आव्हान केलं आहे. यामध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांने निवडणूकी आयोगाची भेट घेऊन टीएमसीवर कारवाईची करणयाची मागणी केली. दरम्यान भाजप आज नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणार आहे. तर दुसरीकडे याचा निषेध म्हणून ममता बॅनर्जी यांनीही आक्रमक पवित्रा घेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांची प्रतिमा तोडण्याचा प्रकार पश्चिम बंगालच्या अस्मितेशी जोडून भाजपावर निशाणा साधला असून ईश्वरचंद्र यांची प्रतिमा तोडण्याच्याविरोधात तृणमूलकडून रॅली काढण्याची घोषणा केली आहे.
Updated : 15 May 2019 11:54 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire