'भाजपची असभ्य संस्कृती पडळकर आपण फार लवकर शिकलात' – रुपाली चाकणकर
X
“शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला करोना”, गोपीचंद पडळकर यांची खालच्या भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पडळकरांवरच्या या वक्तव्यावर त्यांचा समाचार घेतला आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘गोपीचंद पडळकर यांना मानसोपचारांची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत बारामतीकरांनी पडळकर यांच्यासारखा व्हायरस बाजूला ठेवला त्याबद्दल बारामतीकरांचे आभार मानते. आज पवार यांच्यावर टीका करून पडळकर यांनी आपली वैचारिक पातळी दाखवून दिली आहे. पडळकर यांचे जेवढे वय आहे तेवढी पवार यांची राजकीय कारकीर्द आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे. बारामतीत जप्त झालेले डिपॉझिट आणि त्यातून आलेले नैराश्य यामुळे पडळकर यांनी हे हीन दर्जाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, हेच दिसून येते. त्यामुळे त्यांनी मानसोपचार करून घ्यावेत, असेही चाकणकर यांनी सांगितले आहे. यापुढे पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा.
पंतप्रधान मोदी जेव्हा बारामतीला येतात तेव्हा ते पवार यांच्या कार्याची स्तुती करतात, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. कारण भाजपाची असभ्य संस्कृती पडळकर यांनी फार लवकर आत्मसात केली आहे, असाही टोला श्रीमती चाकणकर यांनी लगावला आहे.