‘त्या’ काकूंची थट्टा करणाऱ्यांना मंत्री यशोमती ठाकूर यांची ताकीद
X
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती 1800 रुपयेवाल्या काकूंची. अनेकांनी हा व्हिडीओ फनी कॅप्शन देऊन शेअर केला आहे. काहिंनीतर यावर मीम्स ही तयार केले आहेत. मात्र या व्हिडीओ मधूनच राज्याच्या महिलांचा आर्थिक साक्षरतेचा प्रश्न समोर आला आहे.
आज अनेक क्षेत्रात महिला काम करताना आपल्या दिसतात. मात्र अनेक वेळा काही महिलांना हिशोब कळत नाही किंवा ग्राहकांकडून त्यांची फसवणुक होते. यावर उपाय म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करावं लगेल यासाठी सरकारने पुढाकार घेणं आवश्यक आहे. महिलांसाठी सरकारच्या विवध योजना, उपक्रम या बद्दल माहिती दिली पाहिजे. या योजना लाभार्थी महिलांपर्यंत खरचं पोहचल्या आहेत का? हे पाहण ही तितकच आवश्यक आहे.
या व्हिडीओवरुन आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली असून ‘’घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत.’’ असं या पोस्टमधे म्हटलं आहे.
नक्की काय आहे या व्हिडीओ मध्ये