Home > Max Woman Blog > साथ बायकोची!

साथ बायकोची!

साथ बायकोची!
X

'आज मी जो काही, तो आईमुळेच', असं जाहीरपणे म्हणायला आपल्याकडं प्रतिष्ठा आहे. अशा माणसाला सुसंस्कृत वगैरे मानलं जातं. पण, 'मी आज जो काही आहे, ते माझ्या बायकोमुळंच', असं कोणी जाहीरपणे म्हणणं बायकोलाही खटकेल, एवढा हा टॅबू आहे.

इंदुरीकर टाइपच्या कीर्तनकार वगैरे लोकांनी तर आईच्या गौरवीकरणात बायको नावाच्या प्रकरणाला एवढं दुय्यम स्थान दिलंय, की विचारू नका. अमेरिकेचे अध्यक्ष जाहीर सभांमधून बायकोला घेऊन थिरकतात. आपल्याकडं मात्र, असं होत नाही. होऊ शकत नाही.

बायकोला 'सोशली रेकग्नाइज' न करण्याचा आपला हा दांभिकपणा त्याच पुरूषसत्ताक व्यवस्थेतनं आलाय, जिनं आईची देवी करून टाकली! त्यामुळं तिला चुकण्याची मुभा नाही. आणि, बायकोनं काहीही केलं तर तिचं सामाजिक स्थान दुय्यमच. यातनं दोघींवरही अन्याय झाला. पण, जातीची उतरंड लावून अन्य जातींना एकमेकांमध्येच भांडायला लावणा-या व्यवस्थेनं इथंही तेच केलं. आई आणि बायको या दोघींचं शोषण झालं, पण त्या दोघी व्यवस्थेविरुद्ध नाही,

एकमेकींशीच भांडत बसल्या. भारतीय कुटुंबाचं हे प्रारूप कठीण आहे. आधुनिकतेच्या नव्या संदर्भात तर त्यातली गुंतावळ आणखी क्लिष्टय. ते लिहायला हवंच नीटपणे. आज मात्र औचित्य ते नाही. आमच्या या गड्याचं आज जोरदार कौतुक. 'पुण्याई आईची' वगैरे तर नेहमीचीच. ही 'साथ बायकोची' मात्र नवी! भर चौकात गाडीवर मिरवतोय हा बायकोची सोबत. शाब्बास रे पठ्ठ्या. खुश केलंस तू!

- संजय आवटे

Updated : 12 Sept 2020 1:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top