Home > रिपोर्ट > माणदेशात विधवांना हळदीकुंकू लावून केला जातोय सन्मान…!!

माणदेशात विधवांना हळदीकुंकू लावून केला जातोय सन्मान…!!

माणदेशात विधवांना हळदीकुंकू लावून केला जातोय सन्मान…!!
X

अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यावर ताशेरे ओढण्याचे काम आपल्या संतांनी केले. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी कीर्तन प्रवचन केली. ‘तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’ असे अनेक संदेश दिले. त्यांचे अवलोकन आपल्या महामानवांनी केले. देव दगडात नसून माणसात आहे. असे अनेक महामानवांनी संतांनी सांगितले. त्यानंतर जिजाऊ माँ साहेब यांनी सतीप्रथेला अनिष्ठ रूढींना कडाडून विरोध केला.

सावित्रीमाईंनी केशवफन अशा गोष्टींवर प्रहार केला. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी वैदिक पुरोहितांना उद्देशुन भटभिक्षुक आहात. ‘धर्माने जगा हरामखोरी करू पहाल तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही’. अशा शेलक्या शब्दात वैदिक पुरोहितांची कानउघडणी केली होती. अशा विद्रोही विचारांनी प्रभावित होऊन सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांना न जुमानता, उन्नती महिला विकास सामाजिक संस्थेनं नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करुन एक नवा पुरोगामी विचार मांडला आहे.

उन्नती महिला विकास सामाजिक संस्थेच्या अनिता पाटील यांनी हा उपक्रम राबवला आहे. कोणत्याही स्त्री ने विधवेचं जीवन जगू नये. कारण त्यांच्या आईंच्या वाट्याला तेच जीवन आले. त्यांनी त्यांच्या विधवेचं जीवन जगू देत नाहीत. त्यांच्या आईला हळदीकुंकू लावून त्यांचा सन्मान करतात. गेल्या संक्रांतीला त्यांनी सर्व विधवांचा हळदीकुंकू लावून व ओठी भरून सन्मान केला. आजपर्यंत कुणी ही अशाप्रकारे सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा वारसा सांगतात पण आचरणात आणत नाहीत. त्यांनी त्याची मुहूर्तमेढ दुष्काळग्रस्त माणदेशात रोवली आणि त्याची सुरवात घरापासून केली.

महिलांचं सक्षमीकरण व्हावं बालविवाह बंद व्हावा. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावं यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात.

त्या लोकांना जागृत करताना सांगतात ‘गाडगेबाबांनी जी देवाची संकल्पना मांडली. ती च माझी आहे ‘देव दगडात नसून माणसात आहे’. त्यामुळे स्त्रियांना माणुस म्हणुन जगता आले पाहिजे. विशेष बाब म्हणजे परिवतर्नाची सुरुवात घरातून व्हावी या विचाराने त्यांनी त्यांच्या बहिणीचा पुर्नविवाह लावून दिला!!

Updated : 31 Jan 2020 9:52 PM IST
Next Story
Share it
Top