Fact check: आंदोलनातील लाठीवाली 'ती' व्हायरल महिला नेमकी कोण?
Fact check: आंदोलनातील लाठीवाली 'ती' व्हायरल महिला नेमकी कोण? Who exactly is the 'she' viral woman in the movement?
X
सध्या देशभर किसान आंदोलनाची चर्चा आहे. हजारो शेतकरी केंद्रसरकारच्या कृषी धोरणाला विरोध करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. अनेकांनी आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये एक फोटो खुप व्हायरल झाला तो म्हणजे पोलिसांवर लाठी उगारलेल्या महिलेचा.
हा फोटो शेअर करताना त्या महिलेला झाशीच्या राणीची उपमा देण्यात आली. यातून तुमचे लाइक केमेंट वाढले असतील पण लोकहो या फोटोची सत्यता तुम्ही पडताळली आहे का? नसेल तर राहुदे आम्ही सांगतो..
हा फोटो हिम्मत सिंह गुजर या ट्वीटर हॅंडल वरुन ट्वीट करण्यात आला. त्याला "असली झांसी की रानी जो किसान हक के लिए कुद पडी है युध्द के मैदान में" अशी कॅप्शन दिली आहे. सोबतच 'किसान अब दिल्ली फतह करेगा' 'किसान विरोधी कानून वापस लो' असे हॅश टॅग वापरण्यात आले आहेत.
अपेक्षा सुर्यवंशी या ट्वीटर हॅंडलवरुन देखील हा फोटो शेअर करण्यात आला. त्याला 'किसान विरोधी अध्यादेश जारी करने वालों ये है झांसी की रानी' अशी कॅप्शन दिली आहे.
रिव्हर्स इमेजच्या सहाय्याने आम्ही या फोटोची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला 'हैद्राबाद फनी क्लब' नावाचे एक फेसबूक पेज मिळाले. या पेजवर 10 सप्टेंबर 2016 ला हा फोटो अपलोड करण्यात आला होता. मात्र फोटो पोस्ट करताना कोणतीही न दिल्याने हा फोटो नेमका कुठला आहे? हे कळले नाही.
मग आम्ही अधिक शोध घेतला असता हा फोटो 2018 मध्येही व्हायरल झाल्याचे लक्षात आले. 'केरला स्टुडंट युनीयन' या फेसबूक पेज वरुन 6 ऑक्टोबर 2018 ला हा फोटो शेअर करण्यात आला त्याला 'ही महिला पोलिसांच्या एका गोळ संपु शकते पण संघर्ष पक्का आहे. कारण संघर्ष करणारा जिद्दी आहे.'असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
काय आहे व्हायरल सत्य ?
या शेतकरी आंदोलनात अनेक शेतकरी महिला सामील झाल्या आहेत हि बाब सत्य असली तर हा फोटो या आंदोलनातील नाही. हा फोटो नेमका कुठला व कधिचा आहे हे समोर आलेलं नसलं तरी जुना असल्याचं लक्षात येतं. पण महिलांनी जर लढण्याचं मनात आणलं तर काय करु शकतात.. महिला शक्ती म्हणजे काय? हे मात्र या फोटोवरुन लक्षात येतं.