मी जेव्हा ट्रोल होते
X
शर्मिला येवले
प्रत्येक मुलींला जगात,समाजात वावराताना किंवा ज्या घरात पुरूषप्रधान संस्कृती आहे तिथे वावरताना कोणत्याना कोणत्या छळाला सामोरं हे जावचं लागतं.आर्यसंस्कृती च्या आधी स्त्रीसंस्कृती होती अस कुठे तरी माझ्या ऐकण्यात आलं होतं.
पण आज आपण 20 व्या शतकात जगतोय तरी कुठल्याही महिला कसा त्रास देता येईल हा कडेच समाजाच जास्त लक्ष असतं.मग तो शाब्दिक,मानसिक, शारिरीक, लैंगिक अनेक प्रकारचे असतात त्रास.
अगदीच आज मी माझा अनुभव सांगू या आव्हानाच्या माध्यमातून सांगू इच्छिते हे बोलण्याचं धाडस स्वाती ताईमुळे माझ्यात आलं.
खरतर,मी समाजात वावरणारी मुलगी आहे.पण मुलगी म्हणजे माल नाही तर ती जबाबदारी आहे.आणि मला समाजात वावरत असताना सगळ्यांत जास्त मानसिक त्रास किंवा छळ हा रिकाम ठेकडे मेसेज करणा-या पुरूष मानसिकतेचा होतो.सगळे मुलं,माणसं बोलताना नक्कीच ताळत्म बाळगतात पण समाजात असे ही काही लोक असतात की जी उभटसुभ असतात.मला दिवसातले 200+ मेसेज फालतु कामाचे असतात म्हणजेच जेवलात का,झोपलात का,काय करता,तुम्हाला आवडेल का बोलायला,तुम्ही बोलत का नाही,तुम्ही खूप मोठ्या,तुम्हाला कोणी आवडत का इत्यादी अशाप्रकारेच असंख्य मेसेज असतात.जस की यांनी विचारलं नाही तर मी जेवणारच नाही..बर इतकंच नाही तर इतका फालतूपणा असतो की तुम्हाला बोलायचं नाही तर मग तुम्ही तुमचा नंबर का सोशल केला.
मला आज या माध्यमातून सांगायचे आहे मी एक राजकीय युवती आहे.समाजात वावरणारी मुलगी आहे. मी तुमच्या फालतू मेसेजला उत्तर द्यायला मोबाईल नंबर सोशल खेला नाही तर लोकांनी अडचणीत काही मदत लागली तर हक्काने त्यांची मुलगी,बहिण,युवती म्हणून फोन करावा आणि मला शक्य असेल तर त्यांची अडचण सोडवावी म्हणून आमच्यासारख्या मुली न घाबारणा-या मुली मोबाईल नंबर सोशल करतात. आणि समाजातले काही लोक फक्त रिकामं बोलायचं म्हणून मेसेज, फोन करतं बसतात.तुम्ही रिकामं टेकडे असतात पण आम्ही मुली रिकामं टेकड्या नाहीत.आम्हाला घरचं काम सांभाळायचं आहे,घरच्याची मान उंचवायची आहे,सगळं सांभाळत समाजात एक मानाचं स्थान निर्माण करायचं आहे. कारणं आम्ही तळागाळातून वर आलो आहोत.
तुमच्या फालतूपणाच्या मेसेज,फोन ने आम्हाला मुलींना मानसिक त्रास होतं असतो.हा तुम्ही कामानिमित्त बोला निश्चय फोन,मेसेज करा पण रिकामे फालतूपणा करत मेसेज कोणत्याच मुलीला करतं जाऊ नकात.नंबर दिसला की मेसेज करून विचारायचं कोण आहे..?माहिती नाही तर तुम्ही करतातच कशाला ना म्हणजे फक्त कुठे ही मुलींचा,महिलेचा नंबर दिसायचा उशीर की लगेच सुरू व्हायचं..हे थांबलं पाहिजे..कारण हा मानसिक त्रास फक्त मलाच नाही तर सगळ्यांच मुलींना असतो.पण मी समाजात भिडते उभे राहते म्हणून मी लढू शकते पण तुमच्या घरातील तुमची बहिण लढू शकते का हे ही लक्षात घेणं गरजेचं आणि जर उत्तर नाही असेल ना तर तुम्ही ही सोशल साईडला रिकामे मुलीसोबत बोलायचं प्रयत्न करतं नका जाऊ..हा काही मुलींना आवडतं असेल..पण लक्षात ठेवा बोलताना स्वतःला मर्यादा घालून घ्या..ही झाली पहिली बाजू...
माझ्यासारखं आता असंख्य मुली राजकारणात येऊ लागल्या आहेत ही नक्कीच कौतुकाची बाब आहे परंतु आम्ही कुठल्याही ही मुलासोबत बोलताना दिसलो किंवा वावरताना दिसलो की लगेच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला बदनाम करायचं ती जर आपल्या पुढे जात असेल तर हाच एक सोपा मार्ग असतो मुलींना मागं ओढण्याचं..मला तरी अजून असा काही अनुभव आला नाही की कोणी आपल्यामागे वाईट,चारित्र्यवर बोलतं असेल म्हणून पण जर अस काही असेल तर मी त्याचं स्वागत करेन कारण माझ्या अनुपस्थितीत ते माझं नाव चर्चेत ठेवतात..
Thanku Swati Tai,Vanshree Tai.😊
#टिप-:(मी सोबत फोटो मुद्दाम टाकतं आहे कारण मी हसतं खेळत जगले तरच मला माझ्या या असल्या मानसिक त्रासातून किंवा अशा mentally तू बाहेर पडायला मदत होते.कारणं मी कस वागायचं हे जग नाही शिकवू शकत. )
समाजात वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे मुली ,महिला आहेत.प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काही तरी मानसिक,शारिरीक छेडछाड किंवा अन्य प्रकारचे त्रास अनुभवलेला असतो.आज कुठे तरी व्यक्त होण्याची गरज आहे.
शर्मिला येवले