मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारची नेमकी काय भूमिका आहे? – स्वाती नखाते
X
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्ययालयात ‘व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे’ सुनावणी पार पडली. यावर बोलताना मराठा मोर्चातील कार्यकर्त्या अॅड. स्वाती नखाते म्हणाल्या की, ‘राज्यात जेव्हा भाजपाचं सरकार होतं तेव्हा कुठल्याही सुनावणीला विलंब होऊ न देणे, कोणत्या प्रकारची स्टेज सुरु आहे? त्याकडे लक्ष देणं, कुणाचं अॅफीडेव्हीट पाहिजे? आणखी काय बाकी आहे? या सगळ्यांकडे मराठा समाजाचं बारीक लक्ष होतं. त्यामुळे पुर्वीच्या सरकारकडून त्यांची भुमीका सामाजाने चोख पणे पार पाडून घेतली. परंतू आता जे तिन जणांचं सरकार आहे. या तिघांची सुध्दा या आरक्षाबाबत नेमकी काय भुमीका आहे? हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण आत्ताचा विरोधी पक्ष सत्तेत असताना त्यांची या बाबत काय भुमीका होती हे पाच वर्षात दिसून आलं. पण या तिघांची भुमीका काय? कारण आत्तापर्यंत या तिघांनीही मराठा आरक्षासाठी पुढाकार घेतला होता. आता त्यांचेच सरकार असल्याने मराठा समाजाची बाजू ठाम पणे मांडण्याचा अधिकार या तिघांना मिळालेला आहे. त्यामुळे आमच्यासारखा तरुणवर्ग सरकारच्या भुमीकेकडे अपेक्षेने पाहातोय.’ असं स्वाती नखाते यांनी म्हटलं आहे.