Home > रिपोर्ट > निसर्ग चक्रीवादळ: रत्नागिरी पोलिसांनी दिला धोक्याचा इशारा

निसर्ग चक्रीवादळ: रत्नागिरी पोलिसांनी दिला धोक्याचा इशारा

निसर्ग चक्रीवादळ: रत्नागिरी पोलिसांनी दिला धोक्याचा इशारा
X

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मुंबईत मंगळवार पासून पावसाती शक्यता जाहिर केली आहे. सोबतच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचीही शक्यता वर्तवली होती. बांग्लादेशच्या दिशेने हे वादळ प्रवास करत असून या वादळाला निसर्ग चक्रीवादळ असे नामकरण करण्यात आलं आहे.

निसर्ग चक्रीवादळ अरवी समुद्राच्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळून जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टीजवळील भागामध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. तसेच, वाऱ्यांचा जोरही अधिक असेल. रत्नागिरी पोलिसांनी यासंदर्भात ट्वीट करुन अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

पुढील चार तासात रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, मुसळधार पाऊस आणि गारा वाऱ्याची शक्यता आहे. ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. म्हणून रत्नागिरीत या काळात सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.

Updated : 1 Jun 2020 7:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top