Home > रिपोर्ट > उर्मिला चा नवरा पाकिस्तानी ?

उर्मिला चा नवरा पाकिस्तानी ?

उर्मिला चा नवरा पाकिस्तानी ?
X

राजकारणात येताच उर्मिला मातोंडकरवर व्यक्तिगत हल्ला होणास सुरवात झाली आहे. उर्मिलाचा नवरा पाकिस्तानी असल्याच्या अफवा सोशल मिडीयावर पसरु लागल्या आहेत.

कोण आहे उर्मिला मातोंडकरचा नवरा?

उर्मिलाचा नवरा मोहिसन अख्तर मीर हा काश्मीरमधील मोठा व्यावसायिक आणि मॉडेल आहे. त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षाने तिला उत्तर मुंबईचं तिकीटही दिलं. आता उर्मिलाला तिकीट मिळताच तिच्याविरोधातल्या अफवांना उधाण आलं आहे. काही फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये उर्मिलाच्या पतीवरून तिच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. उर्मिलाचा पती मूळचा पाकिस्तानी असून तो काश्मिरात मोठा व्यावसायिक असल्याचा मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सध्या फिरत आहे.

सोशल मीडिया ग्रुपमध्ये उर्मिला आणि तिच्या नवऱ्याचे फोटो शेअर करत त्याखाली ‘फार कमी लोकांना माहीत आहे की उर्मिलाने पाकिस्तानी व्यक्तिशी लग्न केलं,’ अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल केला जात आहे. काहींनी तर उर्मिलाने धर्म बदलल्याचेही लिहिले आहे.

४२ वर्षीय उर्मिलाने तिच्याहून नऊ वर्ष लहान असलेल्या मॉडेल आणि व्यावसायिक प्रियकर मोहसिन मीर अख्तरशी लग्न केलं. उर्मिलाचा नवरा मोहिसन अख्तर मीर हा काश्मीरमधील मोठा व्यावसायिक आणि मॉडेल आहे. त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. २०१६ मध्ये उर्मिलाने अगदी मोजक्यांच्या मित्र- परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं.

२०१४ मध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसिनची पहिल्यांदा भेट झाली. मोहसिन अख्तरने स्पष्ट केलं होतं की, लग्नानंतर उर्मिलाने तिचं नाव आणि धर्म दोन्ही बदलले नाहीत.

Updated : 31 March 2019 12:34 PM IST
Next Story
Share it
Top