‘आमचे हात कायद्याने बांधले आहेत अन्यथा...’ वाढत्या महिला अत्याचारावर उमा खापरे यांचा संताप
X
“राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमधे दिवसेंदिवस वाढ होतेय. राज्य सरकारला वेळोवेळी विनंत्या, अर्ज करुन देखील सरकार त्यावर उपाययोजना करत नाहीय. आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत अन्यथा आम्हीच गुन्हेगारांना भर चौकात शिक्षा दिली असती.” ही संतप्त प्रतिक्रीया आहे भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांची. त्या जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
राज्यातील कोविड सेंटर, आश्रमशाळा तसेच पुणे, जालना, रायगड, बुलढाणा या ठिकाणी अत्याचाराच्या घटनांमधे वाढ होतेय. “अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी करून देखील राज्य महिला आयोगाचे पद देखील रिक्त आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन पाठविले. मात्र, त्यांनी निवेदनाला विधायक प्रतिसाद देखील दिला नाही. सरकारला जाग येणार तरी कधी? त्यामुळं आता हा आक्रोश विधानसभेवर मोर्चा काढून व्यक्त होईल” असा इशारा खापरे यांनी सरकारला दिला आहे.
https://youtu.be/lxDI8qE0JQM