Home > रिपोर्ट > "तुम्ही संसदेत बसून पोर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहायला सांगता..."

"तुम्ही संसदेत बसून पोर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहायला सांगता..."

तुम्ही संसदेत बसून पोर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहायला सांगता...
X

देशभरात 21 days Lock Down सुरु असताना नागरिकांना सतत घरात बसून राहणं फारच अवघड झालं आहे. घरात बसून काय करावे असा प्रश्न सर्वांसमोर आहे. छोट्या पडद्यावरील मालिका अनपेक्षित कालावधीसाठी बंद करण्यात आल्यामुळे महिलांनाही आता घरात बसणं अवघड झालं आहे. घरात नागरिकांचं मनोरंजन व्हावं म्हणून दूरदर्शन वाहिनीने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे. (Re telecast Of Ramayan And Mahabharat Serial) या मालिकांच्या पुर्नप्रक्षेपावरुन अभिनेत्री कविता कौशिक हिने केलेल्य़ा वक्तव्यामुळे सोशल मीडीयावर तील ट्रोसर्सनी चांगलच घारेवर धरले आहे.

‘तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता’ असं ट्वीट कविता कोशिक हिने आपल्या ट्वीटर हॅंडलवर व्यक्त केलं आहे. या ट्वीटनंतर तीला ट्रोल केलं जात आहे.

सब टीव्ही चा मालिक F.I.R मधील चंद्रमुखी चौटाला या व्यक्तीरेखेमुळे तीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर तिने ‘डॉक्टर भानुमति ऑन ड्यूटी’ या मालिकेत काम केले. तसेच ती ‘नच बलिये’ आणि ‘झलक दिखलाजा’ या शोमध्ये देखील दिसली होती.

Updated : 29 March 2020 2:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top