Home > रिपोर्ट > औरंगाबादच्या निर्भयाची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ‬

औरंगाबादच्या निर्भयाची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ‬

औरंगाबादच्या निर्भयाची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ‬
X

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड इथे पेटविलेल्या पीडित महिलेचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आगीत ही महिला ९५ टक्के भाजली होती. तिच्यावर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. काल अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

याप्रकरणातील आरोपी संतोष सखाराम मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १० फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

२ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता आरोपी पीडित महिलेच्या घरी आला. त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं. संतप्त आरोपीने महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली. घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला.

Updated : 6 Feb 2020 9:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top