Onion Export Banned : अजुनही वेळ गेलेली नाही तातडीने निर्यात बंदी उठवा : खासदार भारती पवार
X
सोमवारी दुपारी अचानक केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली. हजारो टन कांदा आता बंदरांमध्ये अडकणार आहे. बिहार, बंगालच्या निवडणुकांमुळे केंद्राचा निर्णय असल्याची शक्यता बोलली जात आहे. निवडणुकीच्या राजकारणाची किंमत शेतकऱ्यानं का मोजावी? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
याचे पडसाद आता संसदेत उमटले आहेत. “आधीच लॉकडाउनच्या संकटकालातुन शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल व त्यांचे मोठे नुकसान होईल. ह्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करुन आपण कांदयावरची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतुकदार यांना दिलासा द्यावा.” अशी मागणी दिंडोरी मतदार संघाच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांनी लोकसभेत केली आहे.
“कांद्याच्या किमती खुप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवने गरजेचे आहे.” असं देखील खासदार पवार यांनी म्हटलं आहे.