शिवसेनेच्या दीपाली पाटील ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी
Max Woman | 27 Aug 2019 1:02 PM IST
X
X
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या रिक्त जागी शिवसेनेच्या दीपाली दिलीप पाटील यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. माजी अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या अध्यक्ष पदी पाटील यांची बिनविरोध निवड केल्याचे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची सत्ता आहे. जाधव यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या आरक्षणास पात्र असलेल्या दीपाली पाटील यांच्या उमेदवारी विरोधात अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्यामुळे दुपारी ३ वा. घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवून माघार घेण्याची मुदतही दिली.
मात्र माघार न घेतल्यामुळे उपस्थित सर्व सदस्यांच्या समक्ष पाटील यांचा एक अर्ज शिल्लक असल्याचे स्पष्ट करून त्या बिनविरोध निवडून असल्याचे घोषीत करण्यात आले, असे ठाणे उपविभागीय अधिकारी तथा विशेष सभेचे अध्यक्ष आणि निवडणुकीचे पिठासन अधिकारी अविनाश शिंदे यांनी सांगितले.
Updated : 27 Aug 2019 1:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire