Home > रिपोर्ट > काँग्रेस नगरसेवकाने उगारला, महिला पत्रकारावर हात

काँग्रेस नगरसेवकाने उगारला, महिला पत्रकारावर हात

काँग्रेस नगरसेवकाने उगारला, महिला पत्रकारावर हात
X

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या भावाच्या गुंडगिरीचा वाद थांबत नाही तोच ठाण्यातील एका काँग्रेस नगरसेवकाने एका महिला पत्रकारावर हात उगारल्याची घटना समोर आलीये. अंधेरी मेट्रो स्टेशनवर हा प्रकार घडलाय. तबस्सूम बांगरवाला (Tabbasum Bangarwala) असं या महिला पत्रकाराचं नाव असून, इंडियन एक्स्प्रेस (Indian Express) या इंग्रजी वृत्तपत्रात त्या काम करतात. तर विक्रांत चव्हाण असं या हात उगारणाऱ्या नगरसेवकाचं नाव आहे. त्यांच्याविरुध्द यापूर्वीही पोलिसात काही गुन्हे दाखल आहेत.

आझादनगर मेट्रो स्टेशनवर ठाण्याचे नगरसेवक विक्रांत चव्हाण (Vikrant Chavan) यांचा काही मेट्रो कर्मचाऱ्यांशी वाद सुरू होता. मेट्रो कर्मचारी चव्हाण यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पत्रकार बांगरवाला स्टेशनवर उपस्थित होत्या. पत्रकार म्हणून काय झालं ते समजून घेण्याचा प्रयत्न बांगरवाला यांनी केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कारण नसतांना चव्हाण हे मेट्रो कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत.

विक्रांत चव्हाण यांचा आरडाओरडा थांबत नव्हता. हा भाग सायलेंट झोनमध्ये येतो, त्यामुळे तुम्ही या रीतीने ओरडू नका अशी विनंती बांगरवाला यांनी विक्रांत चव्हाण यांना केली. मात्र विक्रांत चव्हाण यांचा पारा अजूनच चढला. शेवटी बांगरवाला यांनी हा प्रकार त्यांच्या मोबाईलने शूट करण्याचा प्रयत्न केला. तुमचं नाव सांगा अस बांगरवाला यांनी या नगरसेवकाला विचारलं, त्यावर भडकलेल्या विक्रांत चव्हाण यांनी, मी कोण आहे, हे माहिती आहे का तुला, असं म्हणत या महिला पत्रकाराच्या हातावर मारलं. तबस्सूम बांगरवाला यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केलाय. या व्हिडीओत विक्रांत चव्हाण ओरडतांना आणि या महिला पत्रकारावर हात उगारतांना स्पष्ट दिसत आहेत.

या प्रकरणात, विक्रांत चव्हाण यांच्यावर आता काय कारवाई होते, काँग्रेस पक्ष चव्हाण याच्यावर कुठली कारवाई करणा, ते पहावं लागेल. हा प्रकार काल घडलेला आहे, पण अजूनह तरी विक्रांत चव्हाण यांच्याविरुध्द तक्रार दाखल झालेली नाही.

दरम्यान नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे पत्रकार तबस्सूम यांचे आरोप फेटाळले आहेत. आपण १५ जानेवारीला जागृतीनगर ते आझादनगर स्टेशन असा मेट्रो प्रवास केला. त्यादरम्यान आझादनगर मेट्रो स्टेशनवर मी उतरलो. मात्र माझं टोकन मशीनमध्ये टाकल्यानंतर अडकलं, त्यानंतर मी मेट्रो कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले. मेट्रो कर्मचाऱ्यांनी मला सहकार्य केलं, मात्र तबस्समू यांनी काही संबंध नसतांना, या प्रकरणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोबाईल माझ्या चेहऱ्यासमोर धरला, म्हणून मोबाईल बाजुला करण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर तबस्सूम यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय. ट्विटरवर माझ्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली गेली. ही बाब बेकायदेशीर आहे. त्यामुळे तबस्सूम यांनी आपलं विधान मागं घ्यावं, अन्यथा मला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल असं विक्रांत चव्हाण यांनी या पत्रकात म्हंटल आहे.

दरम्यान महिला पत्रकार तबस्सूम बांगरवाला यांनी या प्रकरणात पोलिस तक्रार करायची नाही, बातमीही करायची नाही हे स्पष्ट केलंय.-

https://youtu.be/DBaWNLZ_SrE

“या घटनेनंतर मला अंसख्य कॉल आलेत. त्या सर्वांचे धन्यवाद, सत्तेचा कसा गैरवापर होतो, हे दाखवण्याच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ माझ्या ट्विटरवर टाकला होता. या प्रकरणात मी पिडीत नाही, मला कुठलीही इजा झालेली नाही. केवळ माझा व्हिडिओ थांबवण्यासाठी त्याने हात उगारला होता. मला पोलीस तक्रार करायची नाही किंवा याची बातमीही करायची नाही.”

तबस्सूम बांगरवाला, पत्रकार

कोण आहे विक्रांत चव्हाण ?

विक्रांत चव्हाण, ठाणे महानगरपालिकेत काँग्रेसचे गटनेते

तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेत.

बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात विक्रांत चव्हाण आरोपी

ओवळा- माजीवडा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली

विक्रांत चव्हाण यांच्यावर हाणामारी करण्याचा गुन्हा

Updated : 16 Jan 2020 4:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top