२०२५ पर्यंत १० टक्के महिलांची भर्ती; टाटांचं नवं पाऊल
X
कामाच्या ठिकाणी महिलांना योग्य प्रतिनिधीत्व मिळावं, तसंच दिव्यांग, एलजीबीटी समुदाय यांनाही मुख्य प्रवाहात सामावून घेणं यासाठी टाटा ग्रुप ने नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. २०२५ पर्यंत लैंगिक भेदभाव संपवण्याच्या दृष्टीकोनातून पावले उचलली जाणार असून ५२ महिलांना टाटा स्टीलच्या वर्कशॉप मध्ये नोकरी देऊन याची सुरूवात करण्यात आली आहे.
एकूण रोजगाराच्या दहा टक्के रोजगार महिलांना मिळेल यावर टाटा ग्रुप लक्ष देत असून महिलांची सुरक्षिततता, त्यांच्यासाठी योग्य वातावरण आणि कामाचे तास यावर अधिक भर देण्यात येत आहे.
मीटू ( #MeToo ) चळवळीच्या दरम्यान सुहेल सेठ वर अनेक महिलांनी आरोप केल्यानंतर टाटा ग्रुप ने सुहैल सेठ सोबतचा ब्रँड करार रद्द केला होता. संवेदनशील विषयांवर टाटा ग्रुप नेहमीच कठोर भूमिका घेत राहील आणि महिलांना योग्य सन्मान मिळेल असं वातावरण देण्याचा प्रयत्न केला जाईल असं टाटा ग्रुप ने सांगितलं.
( नोट – या बातमीत टाटा ग्रुप, रतन टाटा, टाटा ट्रस्ट ला टॅग करा )