“पुरावे असतील तर त्या मराठा तरुणांवर केस करा, नाहीतर मराठ्यांची माफी मागा”
X
मराठा समाजातील ८०% टक्के तरुणांना माझी बदनामी केली असून मला आज मराठा समाजात जन्माला आल्याची लाज वाटतेय या आशयाच्या तृप्ती देसाई यांच्या वक्तव्यावर मराठा क्रांची मोर्चातील आघाडीच्या आंदोलनकर्त्या स्वाती नखाते पाटील (Swati Nakhate Patil) यांनी, “८०% मराठा समाजातील तरुण माझी बदनामी करत आहे आणि तसे पुरावे असल्याचंही तुमचं म्हणंण आहे. जर तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही कायदेशीर मार्गाचा वापर करु शकता.” असं म्हणंत मराठा समाजाची पाठराखण करताना तृप्ती देसाई (Trupti Desai) यांच्याकडून माफीची मागणीही केलीय.
भारतावर कोरोनाचं संकट ओढावलेलं असताना यावेळी मराठा समाजावर वक्तव्य करणं कितपत योग्य आहे. राज्यात जमावबंदीचे आदेश दिलेले असताना अशावेळी मराठा समाजाला उचकवणं कितपत योग्य आहे. असं प्रश्न स्वाती नखाते यांनी तृप्ती देसाई यांना विचारला आहे.
“तुम्हाला मराठा समाजामध्ये जन्माला आल्याची लाज वाटतेय आणि घराच बसण्याची वेळ असताना समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे. ताई तुम्ही आतापर्यंत केलेली काम खुप चांगली आहेत. तुमची काही मत आम्हाला पटत असतील नसतील पण आम्ही कधीच तुमचा अनादर केलेला नाही.” अशी भावना यावेळी स्वाती यांनी व्यक्त केली आहे.
“तुम्ही महिलांसाठी एवढा लढा देता पण जेव्हा महिलांवरती अत्याचार होतो तेव्हा आवाज का उठवत नाही. कदाचित तुम्ही ठरवलं असेल एखाद्या गोष्टीवर आवाज उठवावा आणि एखाद्या गोष्टीवर नाही. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीची इच्छा आहे की तुम्ही एखाद्या तरुणीवर एसिड हल्ला झाल्यावर आवाज उठवावा. कुठल्याही महिलेची जात पात न बघता तुम्ही तिच्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे.” असा टोला स्वाती नखाते यांनी लगावला.
“जेव्हा तुम्ही महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला होतात तेव्हा तुमच्या पाठीशी किती टक्के मराठा समाज होता हे सांगाल का? असा सवाल विचारत तृप्ती देसाईंनी सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
https://www.facebook.com/swati.nakhate/videos/2827421137375727/?t=14