सुशांतचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला, पाच डॉक्टरांनी केला हा खुलासा...
X
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा अंतिम पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. या रिपोर्टनुसार सुशांत सिंह याचा मृत्यू गळफास घेतल्याने गुदमरून झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. या रिपोर्टनुसार सुशांत सिंह याच्या शरीरावर कोणत्याही जखमा देखील आढळून आले नाहीत. त्याच्या नखांमध्ये देखील काहीही आढळले नाही. याआधी प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील त्याच्या आत्महत्येचे कारण हे गळफास घेऊन गुदमरून झाल्याचं सांगण्यात आलं होतं. हा अंतिम पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पाच डॉक्टरांनी मिळून तयार केलेला आहे. दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिलेली आहे. सुशांत सिंह राजपूत याने काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पण त्याने आत्महत्या केली नसून ही त्याची हत्या आहे असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एका गटाने प्रचंड त्रास दिल्यामुळे त्यातून आलेल्या नैराश्यातून सुशांत सिंहने आत्महत्या केली, असेदेखील आरोप होत आहेत . दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलेले आहे.