Home > रिपोर्ट > सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आणि ट्रोलर्सचा ऊत !

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आणि ट्रोलर्सचा ऊत !

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आणि ट्रोलर्सचा ऊत !
X

सोशल मीडिया खरं म्हणजे जगाशी एका सेकंदात कनेक्ट होण्याचं सशक्त माध्यम ! आताच्या युगात सोशल मीडियावर नसलेले सेलेब्रिटी -कलाकार सापडणं दुर्मिळच .. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होणं हे आज सगळ्यांना आवश्यक -हवंहवंसं वाटू लागलं आहे . पण कारण काही शुल्लक असलं तरी ट्रोलिंग होण्याचं प्रमाण अफाट आहे ! स्त्री असो अथवा पुरुष , ट्रोलिंग सगळ्यांचे होतंय . फक्त महिलांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातंय ..कारण 'बॉडी शेमिंग हा ट्रोलर्सना मोठा मुद्दा आहे , वाटेल ती टीका करण्याचा ! सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स म्हणजे व्यक्त होण्यासाठी सार्वजनिक स्थळ ..ज्या महिलेच्या शरीराबद्दल टीका होतेय ती देखील चुकीच्या गलिच्छ पदधतीने , ती महिला कुणाची मुलगी , पत्नी , बहीण आहे शिवाय ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे ह्याचा ट्रोलर्स विचार करत नाहीत ह्याची खंत वाटतेय ! अर्वाच्य भाषेत व्यक्त होणाऱ्या ट्रोलर्सना ह्याचही भान नसतं की ह्यामुळे त्यांची सामाजिक -व्यक्तिगत पातळी दिसून येईल ! त्यांना ब्लॉक केलं जाईल ! छे ! औट घटकेच्या ह्या उथळ मनोरंजनासाठी केलेला ह्या ट्रोलर्सचा मी निषेध करते ! - मराठी आणि हिंदीमधील नामांकित अभिनेत्री डान्सर अमृता खानविलकर आपली प्रतिक्रिया नोंदवते !

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल अभिनेत्री विद्या बालनने नुकतंच आपलं मत मांडलं - 'हम पांच ' ह्या मालिकेपासून माझी अभिनय क्षेत्राकडे वाटचाल सुरु झाली , पण त्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकत होते .. पुढे अभिनयाची आवड दिसामाजी वाढतच गेली कारण प्रदीप सरकार ह्या ऍड फिल्म मेकरने माझ्या कॉलेजमध्ये येऊन तेंव्हा ऑडिशन्स घेतल्या होत्या ..माझी निवड झाली , आणि मी त्यांच्यासोबत किमान ४० तरी ऍड फिल्म्स केल्यात ..त्यांनीच माझे नाव विधू विनोद चोप्राकडे दिलं आणि माझा हिंदीतला पहिला सिनेमा 'परिणिता ' आला . तत्पूर्वी -त्या दरम्यान मी साऊथमध्ये प्रयत्नीशील होते ,पण मी स्थूल आहे , हिरॉईन मटेरियल नाही , अपशकूनी आहे अशा अनेक अफवा माझ्याबाबत पसरवल्या गेल्या ! पण , सुदैवाने तेंव्हा सोशल मीडिया आजच्याइतका सशक्त नव्हता ! ट्रोलिंग नव्हते ! मी म्हणतेय , सोशल मीडियावरच्या व्यक्ती बहुधा अनोळखी असतात ,पण साऊथमधले मेकर्स मला ओळखून -जाणून होते तरीही त्यांनी मला अपशकूनी -स्थूल अशा अनेक दूषणांनी आत्महत्या करण्याची आणली होती ! मी देखील डिप्रेशनमध्ये होते ! हिंदी सिनेसृष्टीत परिणिता फिल्मनंतर पुन्हा मला ट्रोल केलं गेलं ..तेही रेडिओसारख्या माध्यमावर ! मी स्थूल झालेय , मला ड्रेसिंग सेन्स नाही ! आय एम मीडियाकोर..! बॉलिवूडसाठी मी लायक नाही ! ह्यात एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरने देखील हात धुवून घेतलेत ! आता बोला ! फर्गेट अबाउट सोशल मीडिया ट्रोलिंग एस्पेशली टार्गेटिंग ऑन विमेन ! बस , एक सवाल का जवाब दिजिये - किसी मेल ऍक्टर्स को कोई यह कहने की हिम्मत नहीं करेगा की उसे ड्रेसिंग सेन्स नहीं है ! मी ह्या सगळ्यातून गेलेय ! माझ्या वडिलांनी माझे मनोबल अतिशय सकारात्मक ठेवलं , आणि म्हणूनच एका नव्या सशक्त मनाच्या विद्याचा जन्म होत गेला !

विराट कोहली जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू ! त्याच्या क्रिकेमधील पुअर परफॉर्मन्सवर अनुष्का शर्मावर टीकेची झोड सोशल मीडियावर उठली होती ! पण आर्मी ऑफिसरची लेक असलेल्या अनुष्काने ह्या टीकेवर 'नो कॉमेंट्स ' हा पवित्रा घेतला ! इतकंच काय , अनुष्का आणि विराटच्या लग्नानंतर अनुष्काचा पहिला सिनेमा होता -'सुई धागा ' . पण मीडियाने अनुष्काला विराटबद्दल विचारलेल्या एकही प्रश्नाचे उत्तर अनुष्काने कटाक्षाने दिले नाही ! अलीकडे अनुष्काच्या निर्मितीतील वेब शोजचा प्रसार विराट त्याच्या सोशल मीडियावर करताना वरचेवर दिसतो ! त्यात काही गैर नाहीच , पण अनुष्काला जितके ट्रोल वेळोवेळी केले गेले तसे विराटला अनुष्काच्या अपयशासाठी जवाबदार धरले गेले नाही ! समाजाची ही मानसिकता अस्वस्थ करणारी आहे !

अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिचे वडील सैफ अली यांची ओळख ज्युनियर नवाब तर आजोबा नवाब (टायगर) मन्सूर अली खान हे संस्थानिक म्हणून नवाब हे सर्वश्रुत आहे ... त्याचा बाद नारायण संबंध सारा अली खानशी जोडला गेला आणि 'लव्ह आज-कल ' ह्या फिल्ममधे तिने अतिशय साधे सलवार कमीज वापरल्याने 'नवाब बेचारी गरीब हो गयी ' असे तिला ट्रोल केले गेले ! वास्तविक सारा अली खान म्हणजे कानामागून आली आणि तिखट झाली ' तिच्या अनेक प्रतिस्पर्ध्यापेक्षा सारा ह्या पिढीची अतिशय लोकप्रिय नायिका आहे ! कलाकार त्यांच्या शुटिंग्ससाठी जी वेशभूषा करतात त्यात दिग्दरशकीय दृष्टिकोन असतो ! पण ट्रोलर्सना सांगणार कोण ? भारतीयांसाठी बॉलिवूडची नंबर वनची दावेदार ठरलेल्या दीपिका पादुकोण गेल्या वर्षी घातलेल्या हिरव्या पफी ड्रेसमध्ये स्वतःला इन्स्टावर पेश केलं तेंव्हा तिला 'पत्ता गोबी ' म्हणत तिला हिणवले गेले ! कबीर सिंग ह्या सिनेमाच्या यशामुळेचर्चेत आलेल्या किआरा अडवाणींच्या घातलेल्या व्हायब्रण्ट यलो ड्रेसला मॅगी नूडल्स म्हणून हेटाळणी झाली !

न्यूयॉर्कमध्ये राहून हॉलिवूडमध्ये भारताचा मानबिंदू ठरलेल्या प्रियंका चोप्राला तिच्या स्टायलिश आणि ट्रेंडी हेयर स्टाईलमुळे भयंकर ट्रोल केले गेले !

महिला सेलेब्रिटीजना त्यांच्या वेषभूषेमुळे तर केशभूषेमुळे सातत्याने ट्रोलिंगला तोंड द्यावे लागतंय ! अर्थात महानायक अमिताभ बच्चन आपल्या इमेज आणि गुडविलबाबत अतिशय दक्ष असून त्यांचेही ट्रोलिंग होत असते ,याबद्दल अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 'मध्ये याबद्दल खंत व्यक्त केली होती !

एकूणच ट्रोलिंगचे हे वादळ आता कुठल्या दिशेने जात आहे हा प्रश्नच आहे .. पण हीन पातळीवरची टीका ही कमकुवत आणि आजारी मनोदशेचे द्योतक आहे ! जागतिक पातळीवर सकारात्मकता कमी होत चाललीये हे चित्र चिंताजनक आहे !

पुजा सामंत,

Updated : 28 Jun 2020 10:14 AM IST
Next Story
Share it
Top