असे असेल महिला विशेष गाड्यांचे वेळापत्रक
X
महानगर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी पनवेल, डोंबिवली, विरार येथून, येत्या सोमवारपासून एसटी बसेस सुरू करण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली.
महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी 15 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. या मागणीनंतर अवघ्या तीन दिवसात (18 सप्टेंबर) अनिल परब यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना विशेष बससेवा सुरु केली जाणार आहे. महिलांची ने-आण करण्यासाठी एसटीने त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार पनवेल-मंत्रालय, डोंबिवली-मंत्रालय आणि विरार-मंत्रालय या मार्गावर महिला विशेष बस चालवल्या जाणार आहे.
असे असेल महिला विशेष गाड्यांचे वेळापत्रक
पनवेल- मंत्रालय (स. ८.१५/संध्या. ५.४५),
डोंबिवली-मंत्रालय (स. ८.१५/संध्या ५.३५)
विरार-मंत्रालय (स. ७.४५/संध्या ५.३५)
या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील, असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
‘महिलांसाठी विशेष बस धावणार’
मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या माझ्या मागणीचा संवेदनशील विचार करून निर्णय घेतल्या बद्दल @CMOMaharashtra@AUThackeray
आणि परिवहन मंत्री @advanilparab यांचे आभार.. @bb_thorat
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 18, 2020