Home > रिपोर्ट > आयसीसीच्या दोन्ही संघांत स्थान मिळवून "ती" ठरली एकमेव महिला क्रिकेटर

आयसीसीच्या दोन्ही संघांत स्थान मिळवून "ती" ठरली एकमेव महिला क्रिकेटर

आयसीसीच्या दोन्ही संघांत स्थान मिळवून ती ठरली एकमेव महिला क्रिकेटर
X

आयसीसीने २०१९ मधील सर्वात्तम महिला क्रिकेटपटूंची निवड केली असता. यामध्ये आयसीसीच्या दोन्ही संघांत स्थान मिळवून स्मृती मानधना ही एकमेव महिला क्रिकेटर ठरली. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट असून स्मृती मानधना ही महाराष्ट्रातील सांगली जिल्यातील आहे. स्मृती मानधनाच्या साथीनं झुलान गोस्वामी, शिखा पांडे आणि पूनम यादवचा आयसीसीच्या वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच स्मृती मानधनासह दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांची आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर तिने महिला क्रिकेट संघाची ओपनर बॅट्समन स्मृति मंधानाने यंदाच्या वर्षी 51 वनडे, 66 टी20 आणि काही कसोटी सामने खेळले आहेत.23 वर्षांच्या स्मृतिने तिने टी20 आणि वनडे सामन्यांमध्ये एकूण 3476 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू हा बहुमान देखील तिला मिळाला आहे.

https://twitter.com/ICC/status/1206825065184210944?s=20

Updated : 18 Dec 2019 2:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top