Home > रिपोर्ट > आमदारांना कर्जाची गरज काय?; स्मिता आष्टेकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल..

आमदारांना कर्जाची गरज काय?; स्मिता आष्टेकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल..

आमदारांना कर्जाची गरज काय?; स्मिता आष्टेकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल..
X

आमदारांना वाहनकर्जासाठी बीनव्याजी ३० लाख रुपये शासनाकडून देण्याच्या निर्णयावरुन सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावर शिवसेना नेत्या स्मिता आष्टेकर (Smita Ashtekar) यांनीही आमदारांना बीनव्याची वाहन कर्जाची गरज काय असा खडा सवाल उपस्थित केला आहे. एकाही आमदाराने या निर्णयाविरोधात आवाज न उठवल्यामुळेही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

“आमदारांना ३० लाख वाहन कर्ज शासन देणार आहे. वास्तविक पाहता या आमदारांना कर्जाची गरज काय? निवडणुकीला लाखो करोडो रुपये खर्च करुन निवडून येतात त्यांना तीस लाख रुपये वाहनासाठी घेण्याची गरज काय? असा सवाल शिवसेना (Shivsena) नेत्या स्मिता आष्टेकर यांनी उपस्थित केला आहे. या निमित्ताने आमदारांना तीस लाख रुपये बीनव्याजी कर्ज देऊन सर्वसामान्यांवर अन्याय करु नका अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/2073132102833022/

“माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रामाणिक विनंती आहे की, ही मदत द्यायचीच असेल तर महिला आश्रमांना, अनाथ आश्रमांना, वृद्धाश्रमांना द्यावे जेणेकरुन तीथे त्याचा व्यवस्थित उपयोग केला जाईल. लोकांना आपल्याकडून खुप अपेक्षा आहेत. आज जर बाळासाहेब असते तर जातीने या गोष्टीत लक्ष घातलं गेलं असतं ” अशी भावना स्मिता आष्टेकर यांनी व्यक्त केली.

Updated : 16 March 2020 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top