ज्येष्ठ सिने पत्रकार ललिता ताम्हणे यांचं निधन
X
ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचं दीर्घ आजारामुळे ठाण्यात दुःखद निधन झाले. त्या ६० वर्षाच्या होत्या. लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचे त्यांनी संपादन केले होते. मृदू,,लाघवी स्वभावाच्या ललिता बाईंनी सिने पत्रकारितेला गॉसिप पासून दूर ठेवून वास्तव आणि सत्याचा त्यांनी सतत पुरस्कार केला. अनेक अभिनेत्रींबरोबर त्यांचे मैत्री आणि स्नेहाचे संबंध होते. नूतन, स्मिता पाटील, माधुरी दिक्षित, रेणुका शहाणे, रेखा, दीप्ती नवल, मृणाल कुलकर्णी, प्रिया तेंडुलकर, प्रतीक्षा लोणकर आदींचा उल्लेख करावाच लागेल.
त्यांची स्मिता, स्मित, मी:स्मिता पाटील, नूतन, "तें'ची प्रिया प्रिया तेंडुलकर ही पुस्तकें रसिकांना आवडली होती. या पुस्तकांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. उजळल्या दाही दिशा, झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या होत्या. सध्या त्या दीप्ती नवलचं चरित्र लिहीत होत्या. त्यांच्या मागे विधीज्ञ विनीत रणदिवे आणि मुलगी सोनल आणि तीन बहिणी हा परिवार आहे.