सावित्री बाई फुले यांच्यामुळेच प्रेरणा मिळाली- डॉ.मानसी कदम
X
मी परळच्या जी. एस. मेडिकल कॉलेज मधून वैद्यकीय शास्त्राची पदवी मिळवली. सध्या नायर मध्ये occupational Therapist या मेडिकल फील्ड मध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे. इथ पर्यंतच्या शिक्षणाचा प्रवास मी केला तो केवळ सावित्री बाई फुले यांच्या मुळेच,ही जाणीव मला आहे.त्यांनी केलेला संघर्ष मला पुन्हा समजून घ्यायचा आहे आणि माझे करिअर करीत असताना, माझ्या कडून समाजाला कशी मदत करता येईल याची जाणीव मी ठेवीन.
शेणा,दगडाचा मारा झेलत,स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्री बाई चालत राहिल्या म्हणूनच आपली वाट प्रशस्त झाली.
या वाटे वरून चालताना सावित्रीबाईंची आठवण तर काढायला हवी.3 जानेवारी हा सावित्री बाई फुले यांचा जन्म दिवस.राष्ट्र सेवा दल हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करत असते.
या दिवशी दारात रांगोळी,घरावर आकाश कंदील,दरवाज्याला फुलांचे तोरण,आणि उंबरठ्यावर विवेकाची एक पणती मी लावणार आहे आणि सावित्री बाई जशी कपाळावर कुंकू (चिरी ) लावायच्या तशी चिरी लावून मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे.
-डॉ.मानसी कदम